AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत धक्कादायक विधान, थेट म्हणाले, मला नोबेल पुरस्कार…

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा आणि इस्त्रायल यांच्या युद्धात एक मोठा प्रस्ताव ठेवलाय. या प्रस्तावाला जवळपास सर्वच देशांनी पाठिंबा दिला. मात्र, हमासने हा प्रस्ताव अजूनही मंजूर केला नाहीये. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले.

डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत धक्कादायक विधान, थेट म्हणाले, मला नोबेल पुरस्कार...
Donald Trump
| Updated on: Oct 01, 2025 | 7:25 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत दावा करत आहेत की, त्यांनी जगातील मोठी सात युद्ध रोखली आहेत. त्यामध्येच त्यांनी गाझा आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धादरम्यान 20 कलमी प्रस्ताव ठेवलाय. विशेष म्हणजे या प्रस्ताव हमाससह काही मुस्लिम देशांनी एकत्र येऊन तयार केला. इस्त्रायलचे पंतप्रधान अमेरिकेला पोहोचले आणि त्यांनी आपल्याला हा प्रस्ताव मंजूर असलयाचे स्पष्ट म्हटले. मात्र, हमास अजूनही या प्रस्तावावर राजी होत नाहीये. हमासला दोन ते तीन दिवसांचा वेळ देऊ पुढे जे काही होईल, त्याला हमासच जबाबदार असल्याचे म्हणत थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली. हेच नाही तर इस्त्रायलला मग पूर्ण सूट मिळेल, असेही त्यांनी म्हटले.

काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प युक्रेन-रशिया युद्धात देखील मध्यस्थी करत होते. मात्र, रशियाने त्यांना दाद दिलीच नाहीत. त्यांनी थेट रशियाला परमाणू हल्ल्याची धमकी दिली. डोनाल्ड ट्रम्प बऱ्याचदा नोबेल पुरस्कारावर दावा करताना दिसले. त्यांना नोबेल शांती पुरस्कार हवाय, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आतापर्यंत जगातील तब्बल सात युद्ध थांबवली आहेत. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्काराबद्दल मोठे विधान केले.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला नोबेल शांती पुरस्कार नाही पाहिजे, मला फक्त गाझामध्ये शांती हवी आहे आणि हेच माझे लक्ष आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, युद्धबंदी जवळपास निश्चित आहे. यामध्ये सर्व मुस्लिम देशही सहभागी आहेत. आम्ही सर्व गोष्टी केल्या आहेत, आता वाट पाहत आहोत ती म्हणजे हमासची. जर हमासने त्या प्रस्तावावर सही केली नाही तर त्यांना अत्यंत वाईट परिणाम भोगावे लागतील.

जर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हमासने तो प्रस्ताव मंजूर केला नाही आणि सही केली नाही तर मग आम्ही इस्त्रायलला पूर्ण सूट देणार आहोत. त्यांना जे करायचे ते करू शकतात. जर हमासने हा प्रस्ताव मान्य केला नाही तर त्यांना नर्कात देखील किंमत मोजावी लागेल. आम्ही आतापर्यंत 25 हजार हमासच्या दहशतवाद्यांना मारले आहे, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्ह्टले. पहिल्याच डोनाल्ड ट्रम्प हे मला नोबेल पुरस्कार नको असे म्हणताना दिसले.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.