AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्या सुंदरतेवर डोनाल्ड ट्रम्प फिदा, थेट मंचावर म्हणाले, तुम्ही खूप सुंदर आणि…

डोनाल्ड ट्रम्प हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबद्दल अत्यंत मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांचे बोलणे ऐकून अनेकांनी भूवया उंचावल्या.

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्या सुंदरतेवर डोनाल्ड ट्रम्प फिदा, थेट मंचावर म्हणाले, तुम्ही खूप सुंदर आणि...
Donald Trump and Giorgia Meloni
| Updated on: Oct 14, 2025 | 9:13 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल आणि हमास यांच्या युद्धाबाबत मोठी घोषणा केली. सोमवारी त्यांनी शर्म अल-शेख येथे गाझा शांतता शिखर परिषदेला हजेरी लावली. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रण होते. मात्र, मोदी न जाता त्यांनी त्यांचे दूत पाठवले. नरेंद्र मोदी हे परिषदेला गैरहजर असूनही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत काैतुक केले. भारत आणि अमेरिकेच्या नात्यावर बोलतानाही ट्रम्प दिसले. आता याच दरम्यानचा एक हैराण करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. डोनाल्ड ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे कौतुक केले. फक्त काैतुकच नाही तर त्यांच्या दिसण्यावरही मोठी टिप्पणी केली.

शर्म अल-शेख येथील गाझा शांतता शिखर परिषदेमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट म्हटले की, आमच्याकडे एक महिला आहे, एक सुंदर तरूणी… मला हे बोलण्याची तशी परवानगी नाहीये. कारण तुम्ही हे बोलले तर तुमची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते. डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केले की, स्टेजवर उभ्या असलेल्या इटालियन पंतप्रधान मेलोनी यांच्याबद्दलच्या त्यांच्या टिप्पणीमुळे लिंगभेदाचे आरोप होऊ शकतो.

मेलोनी यांना उद्देशून डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, तुम्हाला सुंदर म्हटले तर काही हरकत नाही ना? कारण तुम्ही सुंदर आहात…  डोनाल्ड ट्रम्प यांचे बोलणे ऐकून मेलोनी या हसताना दिसल्या. आता हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी मंचावरून मेलोनी यांच्या सुंदरतेचे जोरदार काैतुक केले आहे.

यावेळी परिषदेमध्ये उपस्थित अनेक देशांचे पंतप्रधान देखील उपस्थित होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्याप्रकारे मेलोनी यांचे काैतुक केले, त्यानंतर अनेक लोकांनी भूवया उंचावल्याचे बघायला मिळाले. यावेळी शरीफ यांची फिरकी घेताना देखील डोनाल्ड ट्रम्प दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट भारत-पाकिस्तान संबंधांवर मोठा प्रश्न शरीफ यांना विचारला. ज्याला त्यांनी थेट होकार दिला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...