AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-पाकिस्तानबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचा भर मंचावर मोठा दावा, पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांच्या चेहऱ्याचा उडाला रंग, खोटे..

डोनाल्ड ट्रम्प भारत पाकिस्तान युद्ध संपवल्याचा दावा करत आहेत. त्यामध्येच आता त्यांनी भारत-पाकिस्तानबद्दल अत्यंत मोठा दावा केला आहे. यावेळी मंचावर पाकिस्तानचे पंतप्रधान देखील उभे होते.

भारत-पाकिस्तानबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचा भर मंचावर मोठा दावा, पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांच्या चेहऱ्याचा उडाला रंग, खोटे..
Donald Trump
| Updated on: Oct 14, 2025 | 7:26 AM
Share

इजिप्तमध्ये झालेल्या गाझा शांतता परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. गाझा शांतता परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले होते. अगदी शेवटच्या मिनिटाला भारताला यासाठी आमंत्रित करण्यात आले. भारताने देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांच्या माध्यमातून शिखर परिषदेत आपली उपस्थिती दर्शविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष दूत म्हणून ते उपस्थित राहिले. नरेंद्र मोदी या परिषदेमध्ये सहभागी होणार का? यावरून चर्चा रंगताना दिसली होती. शेवटी नरेंद्र मोदी यांनी हिसका दाखवत स्वत: न जाता विशेष दूत म्हणून कीर्तीवर्धन सिंग यांना पाठवले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित नसताना देखील डोनाल्ड ट्रम्प त्यांचे काैतुक करताना दिसले.

परिषदेनंतर पत्रकारांसोबत संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारत हा एक उत्तम देश आहे ज्याचे नेतृत्व माझा एक चांगला मित्र करतोय आणि खरोखरच ते खूप जास्त चांगले काम करत आहेत. मला वाटते की, भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश मिळून चांगले राहतील. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टेजवर त्यांच्या मागे उभे असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे वळून विचारले हो ना?…यावर शहबाज शरीफ यांनी मान हालवत होकार दिला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी चेहऱ्यावर मोठी स्माईल देखील दिली. मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि पाकिस्तानची जवळीकता वाढली आहे. यादरम्यान भारताने एक हात दूर अशी भूमिका अमेरिकेपासूनही घेतली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प सतत नरेंद्र मोदी यांच्यासोबतच भारताचे काैतुक करताना दिसत आहेत. आता त्यांनी नरेंद्र मोदींना परिषदेचे निमंत्रण असूनही ते उपस्थित राहिले नसताना त्यांचे काैतुक करताना दिसले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेले काैतुक ऐकून पाकिस्तानला मिरच्या लागल्या असतील हे नक्की आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रश्न विचारल्यानंतर इच्छा नसताना देखील शहबाज शरीफ यांना होकार द्यावा लागला. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. भारत-पाकिस्तान चांगले राहतील, असे थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...