अचानक डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला मोठा संदेश, जबरदस्त झटका, शेवटच्या क्षणीच..
भारत-अमेरिकेत अनेक वर्षांचे चांगले संबंध मागील काही महिन्यांपासून तणावात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावला आणि सर्वकाही संपले. दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा आणि संवाद देखील बंद आहे. त्यामध्ये मोठा झटका भारताने डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रस आता जगातील युद्धे थांबवण्याकडे अधिक दिसतोय. जगातील मोठी आठ युद्धे मी रोखली आहेत आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाचे परत आल्यावर बघतो असे त्यांनी म्हटले. हमास-इस्त्रायल युद्धाबाबत त्यांनी अत्यंत मोठी घोषणा केली. भारतावर लावलेल्या मोठ्या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. व्यापार चर्चा देखील जवळपास बंदच आहे. भारतासाठी अमेरिका ही मोठी बाजारपेठ राहिली आहे. मात्र, अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारतातून होणारी निर्यात कमी झाली. भारतावर इतका मोठा टॅरिफ लावल्यानंतरही भारताने आपल्यासोबत मजबूत संबंध ठेवावी, ही डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद बंद केला. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा निरोप पाठवला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनपेक्षितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2025 च्या गाझा शांतता शिखर परिषदेसाठी इजिप्तमधील शर्म अल-शेख येथे आमंत्रित केले. भारताला डोनाल्ड ट्रम्प निमंत्रण देतील, असे अजिबातच कोणतेही संकेत नव्हते. मात्र, अचानक त्यांनी नरेंद्र मोदी यांना या शिखर परिषदेचे निमंत्रण पाठवत सर्वांना धक्का दिला. गाझा पट्टीत युद्धबंदी आणि प्रादेशिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही शिखर परिषद आयोजित करण्यात आलीये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवूनही त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निमंत्रणाला प्रतिसाद दिला नाही. भारत सरकारने प्रतिसाद देत आणि पंतप्रधानांच्या जागी पंतप्रधान मोदींचे विशेष प्रतिनिधी परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांची नियुक्ती केली. राजनैतिकदृष्ट्या संतुलित आणि धोरणात्मक प्रतिसाद म्हणून पाहिले जात आहे. मात्र, स्वत: नरेंद्र मोदी यांना निमंत्रण असूनही त्यांनी याठिकाणी जाणे टाळले आणि आपल्या प्रतिनिधींना पाठवण्याचा निर्णय घेतला.
डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने एकप्रकारे मोठा धक्काच दिला. डोनाल्ड ट्रम्प यांना अपेक्षित होते की, नरेंद्र मोदी हे निमंत्रण स्वीकारून लगेचच या शिखर परिषदेसाठी येतील. मात्र, भारताने देखील मोठा डाव टाकत कीर्ती वर्धन सिंग यांना पाठवले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी शेवटच्या क्षणी पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले. या आमंत्रणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः शर्म अल-शेखला भेट देतील की नाही, याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या.
