डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय फसला, टॅरिफपासून मिळणार दिलासा? थेट बदलली भूमिका, आंतरराष्ट्रीय..
मागच्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि टॅरिफ हे एक मोठे समीकरण सतत बघायला मिळतंय. प्रत्येकवेळी डोनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या धमक्या देताना दिसत आहेत. भारतानंतर त्यांनी चीनवर अत्यंत मोठा टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. आता त्यांनी मोठे विधान केलंय.

अमेरिकेने चीनवर अत्यंत मोठा टॅरिफ लावला. भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अमेरिका चीनवर टॅरिफ लावणार की, नाही याबद्दल विविध चर्चा या सुरू असतानाच मोठा निर्णय घेत तब्बल 100 टक्के टॅरिफ चीनवर लावण्यात आला. 1 नोव्हेंबर 2025 पासून टॅरिफची अंलबजावणी होणार आहे. चीन देखील अमेरिकेच्या विरोधात थेट मैदानात उतरला असून मोठा इशारा दिला. दोन्ही देशांच्या व्यापार संबंधांवर याचा वाईट परिणाम होणार असल्याचे चीनने स्पष्ट म्हटले. चीन अमेरिकेच्या विरोधात मोठी कारवाई करणार आहे. अमेरिकेने जर आपला निर्णय बदलला नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल. चीनला युद्ध करायचे नाही पण जर कोणी करत असेल तर चीन देखील मागे हटणार नाही. चीनच्या या मोठ्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने एक पाऊस मागे घेतल्याचे बघायला मिळतंय.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, व्हाईट हाऊस बीजिंगला मदत करू इच्छित आहे, नुकसान पोहोचवण्याचा अजिबातच विचार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनकडून दुर्मिळ पृथ्वी खनिजांच्या आयातीबद्दल नाराज आहेत. चीनने मोठा निर्णय घेत या दुर्मिळ पृथ्वी खनिजांच्या निर्यातीवर बंदी घातल्याने अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे काही उद्योगांवर वाईट परिणाम होत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.
चीनने 12 प्रकारच्या दुर्मिळ पृथ्वी खनिजांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. अमेरिकेच्या टॅरिफनंतर चीनने देखील थेट बदल्याची भाषा केल्याने अमेरिका तोंडावर पडली असून त्यांनी आता भूमिका मवाळ केलीये. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, चीनची काळजी करण्याचे कारण नाही. सगळं ठीक होईल… आदरणीय राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना अलिकडेच खूप वाईट काळ अनुभवावा लागला.
त्यांना आपल्या देशात अजिबातच मंदी पाहिजे नाहीये आणि मला देखील. मुळात म्हणजे अमेरिकेला चीनची मदत करायची आहे, कोणत्याही प्रकारचे चीनला नुकसान पोहोचवायचे नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टच्या काही वेळ अगोदर उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी बीजिंगला विवेकपूर्ण मार्ग निवडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मवाळ भूमिका घेतली.
