AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचे जगाला हादरवणारे भाष्य, भारताबद्दल मोठा वादा, थेट म्हणाले, मी आता तज्ज्ञ झालो टॅरिफ…

डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत भारत-पाकिस्तान युद्धाबाबत मोठा दावा करत असून मीच हे युद्ध रोखल्याचे सतत सांगताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच म्हटले की, मी जगातील आठ युद्धे रोखली आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचे जगाला हादरवणारे भाष्य, भारताबद्दल मोठा वादा, थेट म्हणाले, मी आता तज्ज्ञ झालो टॅरिफ...
Donald Trump claim
| Updated on: Oct 13, 2025 | 7:30 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत नोबेल शांतता पुरस्कारासाठी दावा करताना दिसले. मात्र, नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत ते कधी नसल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी मी जगातील आठ मोठी युद्धे रोखली आहेत, असा थेट दावा केला. मला वाटते की, मी जगातील एका एकमेंव व्यक्ती आहे, ज्याने इतकी मोठी युद्धे रोखली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट म्हटले की, मी काही युद्ध तर टॅरिफची धमकी देऊन रोखली आहेत आणि हजारो लोकांचे जीव वाचवले. धक्कादायक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे परत एकदा भारत-पाकिस्तान युद्धाबाबत दावा करताना दिसले. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्ध मी टॅरिफची धमकी देऊनच रोखले आहे. भारताकडून अगोदरच स्पष्ट सांगण्यात आले की, भारत-पाकिस्तान युद्ध रोखण्यात डोनाल्ड ट्रम्प यांची काहीच भूमिका नाहीये.

नुकताच बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, टॅरिफची धमकी दिली की युद्ध रोखतात. उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तानमधील युद्धात मी म्हणालो होतो, जर तुम्हाला युद्ध करायचे असेल तर तुमच्याकडे अण्वस्त्रे आहेत. मी तुमच्या दोघांवर 100 टक्के किंवा 200 टक्के असा टॅरिफ लावेल. फक्त हेच नाही तर मी टॅरिफ (कर) लावत असल्याचेही त्यांना सांगितले. त्यानंतर हे युद्ध अवघ्या 24 तासांमध्ये थांबले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, पाकिस्तान युद्धादरम्यान मी नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि काही तासात युद्ध थांबले. भारताने वेळोवेळी सांगितले आहे की, डोनाल्ड ट्रम्प हे भारत-पाकिस्तान युद्धाबाबत करत असलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. दोन्ही देशातील अधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि व्दिपक्षीय बैठकीतून युद्धाबाबत निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानने मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर भाष्य केले नाही.

हमास आणि इस्रायल युद्धामध्ये अमेरिकेने 20 कलमी प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव दोन्ही देशांनी मान्य केला असून ट्रम्प यांनी म्हटले की, हे माझे आठवे युद्ध असेल जे मी सोडवले आहे. मी ऐकले आहे की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध चालू आहे आणि मी परत येईपर्यंत वाट पहावी लागेल. मग मी अजून एक युद्ध थांबवणार आहे आणि मी युद्ध रोखण्यात आता चांगलाच माहिर झालोय.

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.