AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प नाराज, थेट जगातील या मोठ्या नेत्याचे नाव घेत केला खुलासा, म्हणाले, मला विश्वास…

डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ वाद आणि युक्रेन-रशिया युद्धामुळे चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, याचा अजिबातच काही नियम नाही. डोनाल्ड ट्रम्प हे ब्रिटेनच्या दाैऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काही मोठी खुलासे केली आहेत.

डोनाल्ड ट्रम्प नाराज, थेट जगातील या मोठ्या नेत्याचे नाव घेत केला खुलासा, म्हणाले, मला विश्वास...
Donald Trump
| Updated on: Sep 19, 2025 | 11:46 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून भारताला टार्गेट करताना दिसत आहेत. हेच नाही तर त्यांनी आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर टीका केलीये. ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, मी पुतिन यांच्यावर खूप जास्त निराश आहे. पुतिन हे रशिया आणि युक्रेन युद्ध संपवण्यापासून रोखत आहेत. ट्रम्प पुढे म्हणाले, मी अध्यक्ष झाल्यावर मला वाटले होते की, मी सर्वात अगोदर रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता करार करेल. हेच नाही तर पुतिन आणि माझ्यामध्ये असलेल्या संबंधांमुळे हे युद्ध संपवणे अधिक सोप्पे मला वाटले होते. सध्या परिस्थिती अशी आहे की, पुतिन हे खूप जास्त लोक मारत आहेत. रशियाचे सैनिक देखील या युद्धात मोठ्या संख्येने मरत आहेत.

यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांना रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धासाठी जबाबदार ठरवले. हेच नाही तर पुतिन यांना हे युद्ध थांबवायचे नसल्याचे म्हणताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. डोनाल्ड ट्रम्प हे युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, या युद्धासाठी ते भारतासह चीनला जबाबदार ठरवत आहेत. त्यांनी काही गंभीर आरोप करत भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. हेच नाही तर युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा शांतीचा मार्ग दिल्लीहून जात असल्याचेही त्यांनी म्हटले.

भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने युक्रेनी नागरिकांचे जीव जात आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो आणि त्यावर रिफायनरी करून जगभरात विकतो. त्या माध्यमातून मोठा पैसा भारताला मिळतो. भारत अमेरिकेतही मोठ्या प्रमाणात वस्तू निर्यात करतो. अमेरिकेतून मिळालेला पैसा तेल खरेदीसाठी रशियाला देतो आणि रशिया याच पैशातून युक्रेनी नागरिकांच्या विरोधात मशिन खरेदी करून युद्ध पुढे सुरू ठेवतो.

भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी. आम्ही त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ हा लगेचच काढून टाकतो. भारताने अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतरही रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली आहे. अजूनही अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. आता डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तान आणि बांगलादेशाला हाताशी धरून भारतावर दबाव टाकण्याचे काम करत आहेत.

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.