डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय, अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणे महाकठीण, ही परीक्षा आणि…
डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून सतत व्हिसाच्या नियमात बदल करताना दिसत आहेत. हेच नाही तर आता डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अत्यंत मोठा निर्णय घेत नागरिकत्व मिळवण्यासाठी लोकांना एक महत्वाची परीक्षा द्यावी लागणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने व्हिसाबाबत कडक भूमिका घेताना दिसत आहेत. हेच नाही तर H1B व्हिसाच्या नियमातही त्यांनी मोठे काही बदल केले आहेत. यामुळे अमेरिकेत राहण्याचे स्वप्न बघणाऱ्यांना अजून काही मोठ्या समस्यांना समोरे जावे लागेल. डोनाल्ड ट्रम्प प्रशासन इमिग्रेशन सिस्टम दुरूस्त करण्यावर भर देत आहे. अमेरिकन सरकारने 2020 ची जुनी व्यवस्था परत एकदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुन्हा एकदा अमेरिकेची नागरिकता मिळवण्यासाठी लोकांना नागरिकशास्त्राची लेखी परीक्षा पास करावी लागणार आहे. 2025 मध्येच हे लागू केले जाईल.
इमिग्रेशन विभागाने म्हटले की, 2025 पासून पुन्हा एकदा नागरिकशास्त्राची परीक्षा अनिवार्य करण्यात आली. ही परीक्षा त्या लोकांसाठी महत्वाची आहे, ज्यांना अमेरिकेची नागरिकत्व पाहिजे. या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे की, अमेरिकेचा इतिहास आणि सरकारबद्दल त्यांना माहिती असावी. याबद्दल बोलताना USCIS चे प्रवक्ते मैथ्यू यांनी म्हटले की, अमेरिकेची नागरिकता जगभरातील सर्वात मोठी आहे.
या परीक्षेतून हे देखील स्पष्ट होईल की, त्यांना इंग्रजी वाचता, लिहिता आणि बोलता येते. आता ही परीक्षा पूर्वीसारखी नाही तर काही बदल करण्यात आली आहेत. परीक्षा देणाऱ्या व्यक्तीला अमेरिकेच्या इतिहासाबद्दल आणि राजनीतीबद्दल संबंधित 128 प्रश्नांपैकी 20 ते 12 बरोबर उत्तरे द्यावी लागणार आहेत. बायडेन यांनी त्यांच्या कार्यकाळात ही परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेत अनेकांना दिलासा दिला होता. मात्र, आता परत ही परीक्षा सुरू करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प सरकारने घेतला आहे.
काही दिवसांपूर्वीच H1B व्हिसाबद्दलची डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. यामुळे अनेक भारतीय नागरिकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. सतत व्हिसाबद्दल डोनाल्ड ट्रम्प प्रशासन निर्णय बदलताना दिसत आहे. टॅरिफनंतर अनेक वर्षांचे चांगले संबंध भारत आणि अमेरिकेतील ताणले गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे काही अधिकारी भारताबद्दल अत्यंत धक्कादायक भाषा बोलताना देखील दिसत आहेत. रशिया, भारत आणि चीन यादरम्यान एकत्र आल्याचे चित्र जगाने बघितले.
