AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतावरील टॅरिफ होणार रद्द?, डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापाराबद्दल मोठे विधान, थेट म्हणाले, दोन्ही देश..

Donald Trump on India Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच भारताच्या व्यापार चर्चेबद्दल मोठे विधान केले. भारतावर इतका मोठा टॅरिफ लावल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सतत टीका होताना दिसतंय. त्यामध्ये त्यांनी आता थेट मोठे संकेत दिले आहेत.

भारतावरील टॅरिफ होणार रद्द?, डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापाराबद्दल मोठे विधान, थेट म्हणाले, दोन्ही देश..
Donald Trump
| Updated on: Sep 10, 2025 | 7:27 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मागील काही दिवसांपासून सतत टीका होताना दिसतंय. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. त्यानंतर भारत, चीन आणि रशियाची मैत्री वाढली. परत एकदा डोनाल्ड ट्रम्प हे भारतासोबत अगोदरप्रमाणे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताला चीन आणि रशियाच्या अधिक जवळ जाण्यापासून रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक करत आहेत. आता नुकताच भडकावू विधानांनंतर परत एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना भारताची आठवण झालीये. त्यांनी नुकताच भारताबद्दल अत्यंत मोठे विधान केले. मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, वॉशिंग्टन आणि दिल्ली यांच्यात सुरू असलेली व्यापार चर्चेचा यशस्वी निकाल लागेल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले, मला हे सांगताना खूप जाास्त आनंद होतोय की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार तणाव दूर करण्यासाठी चर्चा सुरू आहे. मी माझे अत्यंत जवळचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलण्यासाठी उत्सुक आहे. मला मनातून खरोखरच विश्वास आहे की, आमचे दोन महान देश या व्यापार चर्चांमधून चांगले निर्णय घेतील. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, मला आयुष्यभर नरेंद्र मोदी यांचा खास मित्र म्हणून राहायचे आहे.

ते एक चांगल पंतप्रधान आहेत. मात्र, जे सध्या जे वागत आहे ते मला कळत नाही. बाकी आमचे नाते आणि संबंध चांगले आहेत आणि पुढेही राहणार आहेत. चीनसोबतची भारताची जवळीकता वाढल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार अजूनही भारताबद्दल वादग्रस्त विधाने करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे देखील काही दिवसांपूर्वी भारताबद्दल चुकीच्या गोष्टी बोलताना दिसले. मात्र, आता त्यांची भाषा बदलली आहे.

भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा जवळपास बंद झाली होती. हेच नाही तर अमेरिकेचे व्यापार डिल टीम हे महत्वाच्या बैठकीसाठी दिल्लीत येणारे होते, तो त्यांचा नियोजित दाैरा होता. मात्र, टॅरिफच्या वादातून रद्द करण्यात आला. आता एक पाऊस मागे घेऊन परत एकदा व्यापार चर्चा ही अमेरिकेकडून केली जात असल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...