AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला धक्का देणारी बातमी, पाकिस्तान आणि अमेरिकेत मोठा करार, डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव, टेन्शन वाढले, थेट…

डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून सातत्याने भारताबद्दल धक्कादायक विधाने करताना दिसत आहेत. आता ते फक्त धमक्याच नाही तर भारताच्या विरोधात मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय. त्यांनी पाकिस्तानसोबत मोठा करार करून मोठा झटका दिलाय.

भारताला धक्का देणारी बातमी, पाकिस्तान आणि अमेरिकेत मोठा करार, डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव, टेन्शन वाढले, थेट...
Donald Trump and Pakistan
| Updated on: Sep 09, 2025 | 12:55 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने मोठा टॅरिफ लावला. या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेत मोठा तणाव बघायला मिळतोय. मात्र, एकीकडे टॅरिफच्या मुद्द्यावरून भारताच्या विरोधात आग ओकणारी अमेरिका दुसरीकडे पाकिस्तानसोबत मोठे करार करताना दिसतंय. यातून डोनाल्ड ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका स्पष्ट होताना दिसतंय. हेच नाही तर पाकिस्तानला हाताशी धरून भारतावर मोठा गेम करण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहेत. आता नुकताच भारताला धक्का देणारी आणि खळबळ उडवणारी माहिती पुढे आलीये. ज्यानंतर भारताचे टेन्शन वाढलंय.

अमेरिकेच्या धातू कंपनीने नुकताच पाकिस्तानसोबत तब्बल 50 करोड डॉलरचा खनिज करार केला. या करारावर सह्या देखील झाल्या आहेत. हा भारताला अत्यंत मोठा धक्काच म्हणावा लागेल. पाकिस्तानातील सर्वात मोठ्या महत्त्वाच्या खनिजांच्या खाणकाम करणाऱ्या पाकिस्तानच्या फ्रंटियर वर्क्स ऑर्गनायझेशनने मिसूरीस्थित यूएस स्ट्रॅटेजिक मेटल्ससोबत सहकार्य योजनांसाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. याचा फायदा थेट पाकिस्तानला होणार आहे.

या करारानुसार, पाकिस्तानमध्ये एक पॉली मेटॅलिक रिफायनरी उभारली जाईल. गेल्या महिन्यात वॉशिंग्टन आणि इस्लामाबाद यांच्यात व्यापार करार झाल्यानंतर हा करार झाला आहे. यामुळे पाकिस्तानला मदतीला घेऊन अमेरिका भारताला धक्के देताना दिसत आहे. एकीकडे भारतावर मोठा टॅरिफ लावून भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आणण्याचा डाव डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. दुसरीकडे मात्र पाकिस्तानसोबत मोठे करार केले जात आहेत.

अमेरिकन कंपनी पाकिस्तानमधील खनिजे आणि तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्यासाठी गुंतवणूक करतंय. यूएस स्ट्रॅटेजिक मेटल्स महत्त्वपूर्ण खनिजे तयार करते आणि पुनर्वापर करते. मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अमेरिकेतील जवळीकता चांगलीच वाढल्याचे बघायला मिळतंय. मात्र, दोन्ही देश मिळून भारताच्या विरोधात कट रचत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तीन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या लष्करातील मोठे विमान अचानक पाकिस्तानच्या महत्वाच्या आर्मी एअरबेसवर उतरले, ज्यानंतर एकच खळबळ उडाली. आता दोन्ही देशांमध्ये मोठा करारा झाला असून भारताची डोकेदुखी वाढल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसतंय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...