सर्वांनाच धक्का… जे घडायचं नव्हतं तेच घडलं, कोर्टाने ट्रम्प यांना दिला फ्री हॅंड, आता…
डोनाल्ड ट्रम्प हे एका मागून एक जगाला धक्के देताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर भारत आहे. भारतीय नागरिक हे मोठ्या संख्येने अमेरिकेत वास्तव्यास आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेतील चांगले संबंध ताणले आहेत. भार

डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून जगातील अनेक देशांना टॅरिफच्या मुद्द्यावरून धमक्या देताना दिसत आहेत. हेच नाही तर त्यांनी अमेरिकेत राहणाऱ्या इतर देशांच्या नागरिकांना त्रास देण्यासही सुरूवात केलीये. त्यामध्येच त्यांना आता कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला इमिग्रेशन धोरण लागू करण्यास मोकळीक मिळाली आहे. आता ते थेट बाहेरील देशातील नागरिकांना परत जाण्याचे आदेश देऊ शकतात. याचा सर्वात मोठा धोका हा भारताला आहे. अनेक भारतीय नागरिक हे अमेरिकेत वास्तव्यास आहेत. मोठं मोठ्या पदांवर अमेरिकन कंपन्यांमध्ये भारतीय नागरिक आहेत. आता हे धोरण भारतीयांसाठी घातक ठरणार आहे.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे, ज्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे इमिग्रेशन धोरण लागू करण्यास मोकळीक पूर्णपणे मिळाली आहे. फक्त एक छोटीशी अट ठेवण्यात आली आहे, जर एजंटना कळले की, समोरची व्यक्ती अमेरिकन नागरिक आहे किंवा कायदेशीररित्या देशात राहत आहे, तर त्याला ताबडतोब निघून जावे लागेल. मात्र, घातक असे की, इतर देशांच्या नागरिकांवर थेट कारवाई करता येईल.
या धोरणामुळे देशाची सुरक्षा मजबूत होईल आणि बेकायदेशीर कारवायांना आळा बसेल, असा दावा प्रशासनाचा आहे. मात्र, आता यामुळे इतर देशातील नागरिकांना अमेरिकेत राहणे अवघड झाल्याचे बघायला मिळतंय. एक तर टॅरिफच्या मुद्द्यावरून जग त्रस्त झालेले असताना आता हा दुसरा निर्णय अधिक धोकादायक असल्याचे बघायला मिळतंय. मागील काही वर्षांपासून अमेरिकेतून व्हिसाची मुदत संपलेल्या लोकांना हद्दपार केले जात आहे. त्यामध्ये व्हिसाच्या अटींमध्येही बदल करण्यात आलाय.
लोक ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांविरुद्ध निषेध करत आहेत. जुलैमध्ये काही स्थलांतरितांनी ट्रम्प प्रशासनाविरुद्ध कारवाईचा खटला दाखल केला. हेच नाही तर ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, इतर देशातील नागरिक येथे येऊन मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळवत आहेत आणि पैसा कमावत आहेत. यामुळे अमेरिकन लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत.
