AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! टॅरिफच नाही भारतावर अजून निर्बंध लादा… या देशाच्या राष्ट्राध्यक्षाचे खळबळजनक विधान, म्हणाले, फक्त..

अनेक वर्षांपासूनचे भारत आणि अमेरिकेतील संंबंध टॅरिफच्या मुद्द्यावरून ताणले आहेत. भारताला अमेरिकेकडून सातत्याने धमकावले जात आहे. यादरम्यान अनेक देश हे भारताच्या बाजूने ठामपणे उभे असतानाच आता धक्कादायक विधान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केले.

मोठी बातमी! टॅरिफच नाही भारतावर अजून निर्बंध लादा... या देशाच्या राष्ट्राध्यक्षाचे खळबळजनक विधान, म्हणाले, फक्त..
Donald Trump
| Updated on: Sep 08, 2025 | 11:55 AM
Share

अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावून मोठा धक्का दिला. अनेक देश हे अमेरिकेच्या या निर्णयाच्या विरोधात पुढे आले. भारतातून अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात कमी झालीये. याचा फटका हा उद्योगांना देखील बसलाय. युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धात भारताने आपली भूमिका तटस्थ ठेवलीये. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नादाला लागून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेंस्की हे देखील भारताविरोधात आग ओकताना दिसले. हेच नाही तर वोलोदिमिर जेलेंस्की यांच्यासोबत भारताचे संबंध चांगले आहेत. आता त्यांनी भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफबद्दल अत्यंत मोठे आणि धक्कादायक असे विधान केले.

वोलोदिमिर जेलेंस्की यांनी नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी भारतावर अमेरिकेने लावलेला 50 टक्के टॅरिफ अगदी बरोबर असल्याचे म्हटले, ज्याने खळबळ उडाली. वोलोदिमिर जेलेंस्की यांनी मुलाखतीमध्ये बोलताना म्हटले की, भारत, चीन आणि रशिया एकाच मंचावर आले, त्यावेळी मला त्यांच्यामध्ये जुगलबंदी दिसली. मला स्पष्ट वाटते की, भारतावर अमेरिकेने जो टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय तो अगदी बरोबर आहे.

रशियासोबत जे देश व्यापार करतात त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे. मुळात म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे सध्या जे पाऊले उचलत आहेत, त्यावर मी खूप म्हणजे खूप जास्त आनंदी आहे. मला वाटते की, रशियासोबत कोणताही व्यापार झाला नाही पाहिजे. भारतावर टाकलेल्या निर्बंधांचे मी स्वागत करतो. पुतिनचे सर्वात मोठे हत्यार तेल आणि गॅस आहे. ते विकून त्यांना ताकद मिळत आहे. त्यांची तीच ताकद काढून घेतली पाहिजे.

भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता सातत्याने दबाव टाकण्याचे काम अमेरिकेकडून सुरू आहे. मात्र, भारताने अमेरिकेच्या अटी या मान्य केल्या नाहीत. हेच नाही तर अमेरिकेच्या नाकावर टिच्चू भारताने रशियासोबत अजून काही महत्वाची करार तेलाबाबत केली आहेत. हेच नाही तर ऑगस्ट महिन्यापेक्षा अधिक प्रमाणात भारत हा सप्टेंबर महिन्यात अधिक तेल रशियाकडून खरेदी करत आहे. मात्र, जेलेंस्की यांचे टॅरिफच्या मुद्द्यावरील भाष्य हे भारतासाठी मोठा धक्का म्हणावा लागेल.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी