AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन घटवताना प्रोटीन का महत्वाचे मानले जाते ? डॉक्टर काय म्हणतात ?

वजन कमी करण्यासाठी लोक आपल्या डाएटमधून कॅलरी कमी करतात. परंतू या दरम्यान जर प्रोटीनचे प्रमाण वाढवले नाही तर अडचणी होतात. त्यामुळे प्रोटीन वजन घटवण्यात कसे मदतगार ठरते हे पाहूयात....

वजन घटवताना प्रोटीन का महत्वाचे मानले जाते ? डॉक्टर काय म्हणतात ?
protein
| Updated on: Nov 06, 2026 | 4:54 PM
Share

आजकल जो तो हेल्थ कॉन्शस झालेला असून वजन घटवण्यासाठी वर्कआऊटसह आपल्या डाएटची देखील काळजी घेत आहेत. काही लोक आपल्या डाएटमध्ये प्रोटीनला आऊट करत असतात. परंतू अनेकांना हे माहिती नाही की वजन घटवण्यात प्रोटीनची भूमिका महत्वपूर्ण असते. त्यामुळे वजन घटवण्यास अखेर प्रोटीन कसे काय उपयोगी असते हे पाहूयात.

क्या म्हणतात डॉक्टर

वजन घटवण्याच्या प्रक्रियत प्रोटीनची भूमिका महत्वाची असते. नेहमी लोक वजन कमी करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये कॅलरी कमी करतात. परंतू या दरम्यान योग्य प्रमाणात प्रोटीन घेण्याची देखील गरज असते. प्रोटीन न केवळ शरीराच्या मांसपेशींना कायम ठेवण्यात मदत करते, तर मेटाबॉलिझ्म आणि भूक नियंत्रित करण्यातही महत्वाची भूमिका निभावते. जेव्हा एखादा व्यक्ती वजन कमी करण्यासाठी कॅलरी कमी करतो, तेव्हा शरीर फॅट सोबत स्नायूंनाही ऊर्जेसाठी वापरते. त्यामुळे योग्य प्रमाणात प्रोटीन घेतल्याने स्नायूंचे नुकसान कमी होण्यास मदत मिळते. यामुळे वजन घटवण्याच्या दरम्यान शरीराचे स्नायू सुरक्षित रहातात आणि शरीराची कार्यक्षमताही कायम रहाते.

प्रोटीन का गरजेचे ?

प्रोटीनचा एक मोठा फायदा हा देखील आहे की याला पचवण्यास शरीराला कार्बोहायड्रेट आणि फॅटच्या तुलनेत अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. या थर्मिक इफेक्ट ऑफ फूड म्हटले जाते. मात्र, यामुळे कॅलरी बर्नमध्ये होणारी वृद्धी मर्यादित असते. परंतू ही वजन नियोजनात सहायक होऊ शकते. याशिवाय प्रोटीन पोटाला दीर्घकाळ भरल्याची जाणीव निर्माण करण्यास मदत करते. खास करुन जेव्हा फायबरसह संतुलित भोजनासोबत घेतले असता प्रोटीनचे पर्याप्त सेवन ब्लड शुगरला स्थिर राखण्यास मदत करु शकते.

एंडोक्रायनोलॉजीच्या नजरेने वजन घटवण्याच्या दरम्यान हार्मोन संतुलन आणि मेटाबॉलिझ्मचे ध्यान ठेवणे गरजेचे असते. लठ्ठपणा इन्सुलिन रेजिस्टन्स आणि अन्य मेटाबॉलिक समस्येशी जोडलेले असू शकते. यामुळे वजन कमी करताना केवळ कॅलरी घटवण्याऐवजी संतुलित पोषणावर ध्यान देणे गरजेचे असते. सर्वसाधारणपणे एक स्वस्थ वयस्काला प्रतिदिन शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम सुमारे ०.८ ग्रॅम प्रोटीनची गरज असते. मात्र, वजन घटवणे आणि नियमित एक्सरसाईज करणारे व्यक्तींना याती अधिक गरज असू शकते. डाळी, पनीर,दूध, दही, सोया, टोफू आणि सुका मेवा प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत. यामुळे वजन कमी करण्यास केवळ कमी जेवणे आवश्यक नाही. मात्र, योग्य प्रमाणात प्रोटीन घेणे, नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहारही देखील तितकाच महत्वपूर्ण असते.

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण