AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shabana Azmi : मी मुस्लिम आहे आणि आम्ही नमाज पठण करत नाही…शबाना आझमी यांचं विधान चर्चेत

Shabana Azmi : शबाना आझमी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत धर्माबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Shabana Azmi : मी मुस्लिम आहे आणि आम्ही नमाज पठण करत नाही...शबाना आझमी यांचं विधान चर्चेत
| Updated on: Oct 21, 2026 | 9:42 PM
Share

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी कायम त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अभिनेत्री सामाजिक तसेच राजकीय विषयांवर तिचं मत व्यक्त करते. तसेच धर्मबद्दलही शबाना आझमी त्यांचं मत व्यक्त करतात. अशातच आता शबाना यांनी धर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं असून अभिनेत्री चर्चेत आली आहे. ‘मी मुस्लिम असून नमाज पठण करत नाही, तसेच ‘माशाअल्लाह’ किंवा ‘इन्शाअल्लाह असे शब्द वापरत नाही, कारण त्यावर जावेद अख्तर आक्षेप घेतात’ असं शबाना आझमी म्हणाल्या.

शबाना आझमी यांचं वक्तव्य चर्चेत

मुलाखतीदरम्यान शबाना आझमी म्हणाल्या की, ‘माझे वडील नास्तिक होते. पण माझी आई काही प्रमाणात धर्माचं पालन करायची, पण तीही खूप कट्टर नव्हतीच. मी कधीकधी ‘माशाअल्लाह’ किंवा ‘इन्शाअल्लाह’ म्हणते, तेव्हा जावेद म्हणतात, ‘तू हे सतत का म्हणतेस? समजा कोणी सतत ‘देवाची इच्छा’ असं म्हटलं, तर तुम्हाला कसं वाटेल?’ पण मला वाटतं की, ते शब्द माझ्या भाषेचाच एक भाग आहेत.’

जावेद खूप कट्टर नास्तिक आहेत. मी त्यांना म्हणते, ‘तुम्ही नास्तिक आहात हे इतकं का मिरवता? जर एखाद्या व्यक्तीला धर्माचं पालन करून मानसिक शांतता मिळत असेल, तर त्यांना तसं करू द्या. त्यांना का दुखवायचं? त्यावर ते म्हणतात, कारण ते मला दुखवतात.’

स्वतःबद्दल बोलताना शबाना म्हणाल्या की, ‘होय, मी एक मुस्लिम आहे आणि मला ईद, उर्दू भाषा, खाद्यपदार्थ या सगळ्या गोष्टी आवडतात. पण आम्ही नमाज पठण करत नाही आणि आमचा धर्माशी असा कोणताही थेट संबंध नाही. मला कधीही देवाशी संबंधित संकल्पनेचा सामना करावा लागला नाही. पण धर्म ही खरंच वैयक्तिक बाब असून त्यात शासनानं हस्तक्षेप करायला नको, असं मला वाटतं. हा प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे. जर तुम्हाला प्रार्थना केल्यानंतर बरं वाटत असेल, तर मला त्याची काहीच अडचण नाही.’ आयआयएमयुएनच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शबाना आझमी बोलत होत्या.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?