AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! टॅरिफ, H-1B व्हिसानंतर आणखी मोठा धक्का देण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प, थेट लाखो भारतीय लोक…

America Tariff : कोणत्याही परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भारताला अडचणीत आणायचे आहेत. डोनाल्ड ट्रम्प विविध पद्धतीने भारतावर कारवाई करताना दिसत आहेत. हेच नाही तर भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता ते धमकावताना दिसत आहेत.

जग हादरलं! टॅरिफ, H-1B व्हिसानंतर आणखी मोठा धक्का देण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प, थेट लाखो भारतीय लोक...
donald trump h-1b visa
| Updated on: Oct 10, 2025 | 1:30 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताला कोडींत पकडण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, यासाठी दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. भारत अमेरिकेच्या अटी मान्य करत नसल्याने त्यांचा चांगलाच संताप झाला असून त्यांनी भारतीय लोकांना अमेरिकेतून काढण्यासाठी थेट H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल केला. 71 टक्के भारतीय लोक H-1B व्हिसावर जाऊन अमेरिकेत नोकऱ्या करतात. आता H-1B व्हिसासाठी तब्बल 88 लाख रूपये शुल्क भरावे लागेल त्यानंतरच हा व्हिसा मिळेल. यामुळे आयटी कंपन्यांना सर्वाधिक झटका बसलाय. अमेरिका भारताला एका मागू एक मोठे धक्के देताना दिसत आहे. त्यामध्येच आता अजून एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

रिपोर्टनुसार, H-1B व्हिसाच्या नियमात अजून काही मोठे बदल करण्याच्या तयारीत ट्रम्प प्रशासन आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासन नियोक्त्यांच्या परवान्याचा वापर आणि त्यासाठी पात्रतेवर अतिरिक्त इमिग्रेशन निर्बंध लादण्याची योजना आखत आहे. गृह सुरक्षा विभागाने H-1B व्हिसा श्रेणी सुधारण्यासाठी त्यांच्या नियामक अजेंड्यात नियम बदल प्रस्तावित केला आहे. यामुळे आता नियमांमध्ये मोठे बदल केले जाऊ शकतात. या नियमामधील बदलामुळे व्हिसा मिळवणे अधिक कठीण होणार हे स्पष्ट आहे.

डीएचएस वार्षिक मर्यादेतून वगळलेल्या नियोक्त्यांना आणि पदांना संभाव्य मर्यादा घालण्याची योजना आखत आहे, असे काही वृत्तामध्ये म्हटले. मात्र, याबाबत अजून काही स्पष्टता नक्कीच नाहीये. जर H-1B व्हिसाच्या नियमात अजून काही बदल केले तर त्याचा फटका थेट नवीन व्हिसा धारकांसोबतच जुन्या व्हिसा धारकांनाही बसण्याची दाट शक्यता आहे. यामुळे अमेरिकेत असलेल्या H-1B व्हिसा धारकांच्या टेन्शनमध्ये मोठी वाढ झालीये.

हे बदल H-1B नॉन-इमिग्रंट प्रोग्राम सुधारण्यासाठी आणि अमेरिकन कामगारांच्या वेतनाचे आणि कामाच्या परिस्थितीचे चांगले संरक्षण करण्यासाठी आहेत. जर ट्रम्प प्रशासनाने हे व्हिसा नियम बदलले तर बाहेरील देशातील कामगारांच्या नोकऱ्या संकटात येतील असे स्पष्ट सांगितले जात आहे. अमेरिकन लोकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी आणि त्यांच्या नोकऱ्या सुरक्षित राहाव्यात याकरिता असे निर्णय घेतले जात असल्याचे ट्रम्प प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...