AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफनंतर कुरापती सुरूच, थेट गुप्त करारावर केल्या सह्या, मोठी खळबळ

50 टक्के टॅरिफ कर अमेरिकेकडून लादण्यात आल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सकडून धक्कादायक दावा करण्यात आला आहे. टॅरिफनंतर आता अत्यंत मोठा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफनंतर कुरापती सुरूच, थेट गुप्त करारावर केल्या सह्या, मोठी खळबळ
| Updated on: Aug 10, 2025 | 7:39 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरीफच्या निर्णयानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेत आल्यापासून असे काही निर्णय घेत आहेत, ज्याच्या परिणाम फक्त अमेरिकेवरच नाही तर संपूर्ण जगावर होताना दिसतोय. भारत आणि ब्राझीलवर 50 टक्के कर लादल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून एक दुसरी कुरापत सुरू केलीये. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर इतर देशांकडूनच नाही तर चक्क अमेरिकेतून देखील  जोरदार टीका होताना दिसतंय.

टॅरिफनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा डाव 

50 टक्के टॅरिफ कर अमेरिकेकडून लादण्यात आल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्समध्ये असा धक्कादायक दावा करण्यात आला की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका गुप्त आदेशावर स्वाक्षरी केली, ज्याच्या अंतर्गत अमेरिकेने परदेशातही लॅटिन अमेरिकन ड्रग कार्टेल्सवर लष्करी कारवाई केली जाऊ शकते. जे अत्यंत धक्कादायक आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रम्प यांनी केल्या गुप्त आदेशावर सह्या 

वृत्तानुसार, या निर्देशामुळे नौदल आणि इतर लष्करी तुकड्यांना परदेशी किनाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची परवानगी मिळते.यानंतर आता मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, अमेरिकन सैन्याला मेक्सिकोमध्ये प्रवेश दिला जाणार नाही किंवा ते आमच्या जमिनीवर अशाप्रकारची कोणतीही कारवाई करणार नाहीत, त्यांना तशी परवानगी आम्ही देत नाहीत.

टॅरीफचा निर्णय घेतल्यावर ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय 

मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी म्हटले की, आम्ही सहकार्य आणि समन्वय साधतो, मात्र कोणत्याही प्रकारचा लष्करी हस्तक्षेप अजिबात होणार नाही किंवा आम्ही ते सहन करणार नाही.शेनबॉम यांनी स्पष्ट केले की कार्टेल्सविरुद्ध कोणतीही कारवाई दोन्ही देशांच्या परस्पर करारांनुसार केली जाईल, अमेरिकन सैन्याच्या माध्यमातून नाहीत. आता डोनाल्ड ट्रम्प पुढे काय करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट