AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Tariff: डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ कमी करण्यास तयार, समोर ठेवली ‘ही’ अजब अट

डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाला खास ऑफर दिली आहे. ही ऑफर ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. तसेच या ऑफरमुळे दोन्ही देशांमधील तणावही वाढला आहे. या ऑफरबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

US Tariff: डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ कमी करण्यास तयार, समोर ठेवली 'ही' अजब अट
Trump vs South Korea
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 28, 2025 | 9:32 PM
Share

अमेरिकेने काही दिवसांपूर्वी जगातील बहुतेक देशांवर टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. अनेक देश हा कमी व्हावा यासाठी अमेरिकेसोबत करार करण्यास उत्सुक आहेत. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाला खास ऑफर दिली आहे. ही ऑफर ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. तसेच या ऑफरमुळे दोन्ही देशांमधील तणावही वाढला आहे. या ऑफरबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ट्रम्प कर कमी करण्यास तयार, मात्र…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी दक्षिण कोरियावर 25 टक्के कर लावला आहे. हा कर 15 टक्के पर्यंत कमी करण्यास डोनाल्ड ट्रम्प तयार आहेत. या साठी डोनाल्ड ट्रम्प यांनी 350 अब्ज डॉलर्सची रोख रक्कम मागितली आहे. त्यानंतर दक्षिण कोरियाने ही रक्कम देण्यास नकार दिला आहे. कारण एवढी मोठी रक्कम दिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असं दक्षिण कोरियाने म्हटलं आहे.

ट्रम्प यांच्या अटीमुळे तणाव वाढला

दोन्ही देशांमध्ये टॅरिफ कमी करण्याबाबत चर्चा झाली. अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या वस्तूंवरील शुल्क 25% वरून 15% पर्यंत कमी करण्याची तयारी दाखवली होती. यासाठी ट्रम्प यांनी कोरियाला अमेरिकन प्रकल्पांमध्ये $350 अब्ज गुंतवणूक करण्यास सांगितले होते, मात्र नंतर ट्रम्प यांनी ही रक्कम रोख स्वरुपात मागितली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार कराराची चर्चा मावळली आहे.

दक्षिण कोरियाचे उत्तर

अमेरिकेच्या आ ऑफरवर बोलताना दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार वाई सुंग-लॅक यांनी, $350 अब्ज रोख रक्कम देणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही असं म्हटलं आहे. तसेच अध्यक्ष ली जे-म्युंग यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम देशाच्या अर्थव्यवस्थेला डबघाईला आणू शकते असं विधान केलं आहे. सध्या दक्षिण कोरियाकडे अंदाजे $410 अब्ज परकीय चलनाचा साठा आहे, मात्र या साठ्यातील बहुतेक रक्कम कमी झाल्यास अर्थव्यवस्था संकटात येऊ शकते. त्यामुळे दक्षिण कोरियाने अमेरिकेची ही ऑफर नाकारली आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?