अमेरिकेत हल्ला करणारा व्यक्ती या मुस्लिम राष्ट्राचा नागरिक, खळबळजनक खुलासा, थेट डोनाल्ड ट्रम्प…
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसजवळ अत्यंत मोठा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. ज्यामध्ये दोन नॅशनल गार्ड सैनिक ठार झाले. संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून खळबळ उडवणारी माहिती पुढे येतंय.

अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली. नॅशनल गार्डच्या दोन सैनिकांवर हा हल्ला झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच या हल्लेखोराला सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. हल्लेखोर देखील जखमी आहे. हल्ल्याच्या काही वेळात एका हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली. मात्र, चाैकशीसाठी हा हल्लेखोर सहकार्य करत नाहीये. अगदी व्हाईट हाऊसपासून हकेच्या अंतरावर हल्ला झाल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. अमेरिकन तपास संस्थांनी संशयित हल्लेखोराची ओळख 29 वर्षीय रहमानउल्लाह लकनवाल म्हणून केली आहे. जो वॉशिंग्टनमध्ये राहणारा अफगाण नागरिक आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रहमानउल्लाह लकनवाल 2021 मध्ये एका विशेष व्हिसा कार्यक्रमांतर्गत अमेरिकेत आला होता. त्याचे नागरिकत्व उघड झाल्यानंतर सर्व अफगाण नागरिकांचे स्थलांतर थांबवण्यात आले आहे. हेच नाही तर हल्लेखोराची ओळख झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांच्यामुळेच हा हल्लेखोर अमेरिकेत आल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
विशेष व्हिसा कार्यक्रमांतर्गत अफगाणिस्तानातील युद्धादरम्यान अमेरिकन सैन्याला मदत करणाऱ्या आणि तालिबानच्या धोक्याचा सामना करणाऱ्या अफगाण नागरिकांसाठी होता. मात्र, तो त्याच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरही राहिला आणि आता हा हल्ला केला. आता त्याला देशात बेकायदेशीरपणे उपस्थित असल्याचे घोषित केले. ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडामध्ये होते.
या हल्ल्याच्या घटनेनंतर लगेचच व्हाईट हाऊसला लॉकडाऊन करण्यात आले. अनेक एजन्सी घटनास्थळी पोहोचल्या. गोळीबार दुपारी 2:15 वाजता व्हाईट हाऊसपासून काही ब्लॉक अंतरावर हा हल्ला झाला. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेतले. लकनवाल देखील गोळीबारात जखमी झाला आणि तो ताब्यात आहे. एफबीआयचे संचालक काश पटेल म्हणाले की, दोन्ही जखमी सैनिकांची प्रकृती गंभीर आहे. मात्र, अमेरिकेच्या व्हाईट हाऊसजवळ झालेल्या या हल्ल्यानंतर जगात मोठी खळबळ उडाली.
