रात्री 8 वाजता सर्वकाही होणार उद्ध्वस्त, जगात हाहाकार, थेट वेळ आणि तारीखही सांगितली, ट्रम्प..

Iran War Live News : इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेटपणे इराणला मोठा धमकी दिली. तारख आणि वेळही इराणवरील हल्ल्याची डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली आहे. मात्र, यानंतरही इराणने हार न मानजा डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे.

रात्री 8 वाजता सर्वकाही होणार उद्ध्वस्त, जगात हाहाकार, थेट वेळ आणि तारीखही सांगितली, ट्रम्प..
Donald Trump
| Updated on: Apr 06, 2026 | 7:39 AM

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. युद्ध थांबवण्याची मागणी जगाकडून होत असताना खळबळ उडताना दिसत आहे. त्यामध्येच आता अमेरिका अधिक अॅक्शन मोडवर आली. इराण युद्धबंदी करार करत नाही, चर्चेसाठी तयार नाही आणि होर्मुज खाडीही खुली करत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची चांगलीच सटकल्याचे बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भडकत म्हटले की, जर करार झाला नाही तर संपूर्ण देश उडवून देतो… डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीने जगात खळबळ उडाली. मात्र, तरीही इराण काही मागे हटताना दिसत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर कोणत्या तारखेला, किती वाजता मोठा हल्ला होणार हेच स्पष्ट सांगून टाकले. इराणवर गेल्या काही तासांपासून अमेरिका घातक हल्ले करत आहे. मात्र, इराण अजूनही आपल्या अटीवर ठाम आहे. यादरम्यानच इराणवर सर्वात मोठा हल्ला कधी होणार याची वेळच डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एबीसी न्यूजला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, जर करार झाला नाही तर संपूर्ण देशच उद्ध्वस्त करू. वीज प्रकल्प आणि पायाभूत सुविधांना टार्गेट करून हल्ले केले जाऊ शकतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी संध्याकाळी 8 पर्यंत नवा अल्टिमेटम दिला. करार करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असल्याचेही त्यांनी म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीचा इराणकडून मजाक उडवण्यात आला. त्याच शब्दात इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर देण्यात आले. भारतीय वेळेनुसार, 8 एप्रिल रोजी सायंकाळी इराणवर अमेरिका हल्ला करेल. डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्धबंदीचा करार इराणकडून करून घ्यायचा आहे. या युद्धाची अमेरिकेलाही झळ बसत आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी म्हटले आहे की, जर त्यांनी इराणच्या पायाभूत सुविधांवर हल्ला केला तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. इराणने अमेरिकेला राजनैतिकदृष्ट्या कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला आहे. अनेक देशांमधील इराणी दूतावासांनी सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या वक्तव्यांची खिल्ली उडवून प्रत्युत्तर दिले आहे. इराण युद्धात मागे हटताना दिसत नाहीये.

Follow Us