AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

America Shutdown : अमेरिका हादरली! शटडाऊनमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे सर्वात मोठं संकट, लाखो नोकऱ्या…

सध्या अमेरिकेत शटडाऊन लागू झाले आहे. या शटडाऊनमुळे अनेकांच्या सरकारी नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ट्रम्प नेमकं काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

America Shutdown : अमेरिका हादरली! शटडाऊनमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे सर्वात मोठं संकट, लाखो नोकऱ्या...
donald trump and shutdown
| Updated on: Oct 02, 2025 | 6:04 PM
Share

America Shutdown : अमेरिकेत शटडाऊन लागून 24 तास उलटून गेले आहेत. काँग्रेसमध्ये निधी विधेयक मंजूर न झाल्याने आता हे शटडाऊन लागू झाले असून त्याच फाटका आत ट्रम्प सरकारला बसायला सुरुवात झाली आहे. शटडाऊन लागू होताच आता अमेरिकेत सरकारी आस्थापनांची कार्यालये बंद होण्यास सुरुवात झाली आहे. हा शटडाऊन थांबावा यासाठी सिनेटमध्ये एक प्रस्ताव आणण्यात आला. मात्र या प्रस्तावावरही सहमनी न होऊ शकल्याने आता ट्रम्प सरकारपुढे आव्हानच निर्माण झाले आहे. अनेक सरकारी कर्चमाऱ्याच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ट्रम्प नेमकं काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शटडाऊनचं कारण काय?

ट्रम्प सकारला सिनेटमध्ये निधी विधेयक मंजूर करता आलेले नाही. याविधेयकाच्या बाजूने 55 तर विरोधात 45 मते पडली. हे विधेयक मंजूर होण्यासाठी विधेयकाच्या बाजूने कमीत कमी 60 मते पडणे गरजेचे होते. मात्र आता हे विधेयक मंजूर न झाल्याने आता 30 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून अमेरिकन सिनेटने सरकारचा निधी पुरवठा बंद केला आहे. निधीच नसल्याने आता ट्रम्प सरकारला शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी तसेच इतर प्रशासकीय खर्चासाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळेच आता शटडाऊन लागू करण्यात आला आहे.

…तर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार

अमेरिकेत शटडाऊन होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात शटडाऊन लागू करण्यात आले होते. तेव्हाही अशाच पद्धतीने शसकीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर आले होते. आता पुन्हा एकदा निधी विधेयकावर तोडगा न निघाल्यास अनेक सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे याबाबतच इशारा व्हाईट हाऊस आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी दिला आहे. दरम्यान, आता निधी विेधेयक मंजूर न झाल्यास आगामी किती दिवस अशाच पद्धतीने शटडाऊन राहणार? हा शटडाऊन असाच चालू राहिला तर आगामी काळात अमेरिकेत किती सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार? अशी स्थिती उद्भवू नये यासाठी ट्रम्प सरकार नेमके काय करणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...