AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंत्यसंस्कारातही अज्ञातांची भीती!पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमझाच्या मृत्यूची दहशत, टॉप कमांडरसाठी…

पुलवामा हल्ल्यानंतर हमझा बुरहान मुझफ्फराबादमध्ये एका खाजगी कॉलेजचा प्रिन्सिपल म्हणून ओळख लपवून राहत होता. कॉलेज कॅम्पसबाहेर पडताच अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडून त्याला ठार केले. त्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराच्यावेळी देखील टॉप कमांडरवर कडक सुरक्षेत आल्याचे पाहायला मिळाले.

अंत्यसंस्कारातही अज्ञातांची भीती!पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमझाच्या मृत्यूची दहशत, टॉप कमांडरसाठी...
Hamza BurhanImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 23, 2026 | 11:26 AM
Share

२०१९ मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि अल-बद्रचा कमांडर हमझा बुरहान (उर्फ अर्जुमंद गुलझार डार / कोडनेम ‘डॉक्टर’) याच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानात अनेक कुख्यात दहशतवादी आणि टॉप कमांडर उपस्थित होते. पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या काही काळापासून अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून दहशतवाद्यांच्या होणाऱ्या लक्ष्यित हत्येच्या भीतीपोटी या अंत्यसंस्कारादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हमझा बुरहानची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर इस्लामाबाद येथे पार पडलेल्या त्याच्या अंत्यसंस्काराला हिजबल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन आणि अल-बद्र या दहशतवादी संघटनेचा सर्वेसर्वा बख्त झमीन खान हे प्रामुख्याने उपस्थित होते. स्थानिक लोकांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिज्युअल्सनुसार, पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयचे काही अधिकारी देखील या अंत्यसंस्काराच्या गर्दीत उपस्थित असल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिज्युअल्समध्ये अल-बद्रचा प्रमुख बख्त झमीन खान याच्याभोवती एके-४७ रायफल्स आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले दहशतवादी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. पाकिस्तानातील अज्ञात हल्लेखोरांच्या भीतीमुळे ही अभूतपूर्व सुरक्षा पुरवण्यात आली होती.

कित्येक वर्ष लपवली ओळख

फेब्रुवारी २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाले होते, ज्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी हमझा बुरहान हा एक होता. तो मूळचा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा येथील रहिवासी होता. २०१८ मध्ये तो अधिकृत कागदपत्रांच्या आधारे उच्च शिक्षणासाठी (एमबीबीएसच्या नावाखाली) पाकिस्तानात गेला आणि तेथे अल-बद्र दहशतवादी संघटनेत सामील झाला. जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवाया, तरुणांची भरती आणि टेरर फंडिंगमधील सहभागामुळे भारताच्या गृह मंत्रालयाने एप्रिल २०२२ मध्ये त्याला अधिकृतपणे ‘दशतवादी’ घोषित केले होते. पुलवामा हल्ल्यानंतर तो मुझफ्फराबादमध्ये एका खाजगी कॉलेजचा प्रिन्सिपल म्हणून ओळख लपवून राहत होता, जिथे कॉलेज कॅम्पसबाहेर पडताच अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडून त्याला ठार केले.

कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास

दरम्यान, हमझा बुरहानच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर काश्मीरमधील त्याच्या कुटुंबीयांनी एक पत्रक जारी करून त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. २०१८ मध्ये तो पाकिस्तानात गेल्यानंतर आमचा त्याच्याशी कोणताही संपर्क नव्हता आणि त्याच्या देशद्रोही तसेच दहशतवादी कृत्यांमुळे संपूर्ण कुटुंबाला प्रचंड मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागला, असे त्याच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?