अमेरिका हादरली, थेट व्हाईट हाऊसच्या परिसरात…युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांच्याच जीवाला धोका?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या परिसरात गोळीबार झाला आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गोळीबाराची घटना घडली तेव्हा डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच होते.

White House Firing : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध सुरू होऊन आता एक महिना उलटला आहे. अजूनही हे युद्ध संपलेले नाही. हे युद्ध थांबवण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे अमेरिका, इस्रायल इराणवर मोठे हल्ले करत आहे. इराणकडूनही या दोन्ही देशांना जशास तसे प्रत्युत्तर दिले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी सुरू करा अन्यथा आम्ही मोठे हल्ले करू, अशी धमकी दिली आहे. तर इराणनेही जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता असताना आता मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे निवासस्थानच टार्गेटवर असल्याचे बोलले जात आहे? या निवासस्थानाच्या परिसरात गोळीबार झाला आहे. त्यामुळे आता अमेरिकन पोलीस, लष्कर हाय अलर्टवर आहेत.
नेमकं काय घडलं? कुठं फायरिंग झाली?
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस या इमारतीच्या समोरच असलेल्या लाफायेट पार्क या भागात गोळीबार झाला आहे. या गोळीबाराच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. परंतु गोळीबार करणारा आरोपी मात्र फरार आहे.
व्हाईट हाऊसच्या परिसरात हाय अलर्ट
ही घटना घडल्यानंतर अमेरिकेतील पोलीस तसेच अन्य संस्था एकत्र मिळून फरार आरोपीचा सोध घेत आहेत. या व्यक्तीच्या वाहनाचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या हाती मात्र अद्याप काहीही लागलेले नाही. गोळीबाराच्या या घटनेनंतर व्हाईट हाऊसच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती समोर आली की, त्याची सखोल चौकशी केली जात आहे. ज्या ठिकाणी गोळीबार झाला, तो परिसर डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानापासून खूप जवळ आहे. त्यामुळेच सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गोळीबार झाला त्या वेळी डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच होते.
अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देणारी ही अलिकडेच घडलेली दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात फ्लोरिडामध्ये एक संशयास्पद विमान घिरट्या घेताना दिसले होते. त्यानंतर अमेरिकेच्या एफ-16 या फायटर जेटला अलर्ट जारी करण्यात आला होता.