
डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदला केला. H-1B व्हिसा मिळवण्यासाठी तब्बल 88 लाख रूपये शुल्क भरावे लागणार आहे. यासोबतच नियम कडक केली आहेत. अमेरिकेतील कंपन्यांनी आणि विद्यापीठांनी आपल्या H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना अमेरिकेच्या बाहेर न जाण्याचा इशारा दिला. अमेरिकेत सर्वाधिक भारतीय लोक H-1B व्हिसावर नोकऱ्या करतात. आता ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या नियमात केलेल्या बदलाचा सर्वाधिक फटका भारतीय विवाहांवर दिसून येतोय. H-1B व्हिसा 88 लाख रूपये शुल्का आकारण्यात आल्यानंतर भारतातील NRI नवरदेवांची मागणी कमी झाली. यासोबतच ठरलेल्या विवाहांना सुद्धा नवरदेव अमेरिकेतून भारतात येऊ शकत नाहीये. मोठ्या आयटी कंपन्यांनी H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये सध्या अमेरिकेच्या बाहेर जायचे नाही, असे स्पष्ट सांगितले आहे.
रिपोर्टनुसार, अमेरिकेत नोकरी करणाऱ्या नवदेवाची मागणी जास्त होती. जवळपास सर्वांना जावई बापू अमेरिकेत नोकरी करणारे काही दिवसांपूर्वी हवे होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्याप्रकारे H-1B व्हिसाच्या नियमात बदल केले, त्यानंतर अमेरिकेत नोकरी करणाऱ्या मुलांचे स्थळ मुलीकडील लोक नाकारत आहेत. मुलींसाठी आंतरराष्ट्रीय जोडीदार शोधणारी भारतीय कुटुंबे आता भारतातच राहणारे मुले मुलीसाठी शोधत आहेत. डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतली, याचा भरोसा राहिला नाही.
H-1B व्हिसा हा अमेरिकेतील अनिवासी व्हिसा आहे, जो अमेरिकेतील तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, औषध, वित्त आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांसाठी परदेशी कामगारांना कामावर ठेवण्याची परवानगी देतो. अमेरिकेचा ज्याच्याकडे H-1B व्हिसा आहे, अशा नवदेवांची लग्नासाठी मोठी मागणी असायची. शिवाय आपल्या मुलीला अमेरिकेत जाता येईल, याकरिता पालक देखील H-1B व्हिसा धारक जावई शोधण्यासाठी सर्व प्रयत्न करत. आता अशा स्थळांना स्पष्ट नकार दिला जातोय.
या व्हिसासह अमेरिकेत काम करणाऱ्यांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये मंजूर झालेल्या एकूण H-1B व्हिसा लाभार्थ्यांपैकी जवळजवळ 71 टक्के भारतीय होते. H-1B व्हिसा मिळवण्यासाठी आता 88 लाख रूपये शुल्क भरावे लागणार आहे. हा मोठा धक्का अमेरिकेने भारताला दिला आहे. H-1B व्हिसाच्या नियमातील बदलानंतर अनेक भारतीयांनी लगेचच अमेरिका देखील गाठली.