Keniya Helicopter Crash : हेलिकॉप्टर कोसळून घडली मोठी दुर्घटना; बड्या अधिकाऱ्यासह 7 जणांचा जागीच मृत्यू

हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात बड्या अधिकाऱ्यासह 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Keniya Helicopter Crash : हेलिकॉप्टर कोसळून घडली मोठी दुर्घटना; बड्या अधिकाऱ्यासह 7 जणांचा जागीच मृत्यू
helicopter crash tragedy
Image Credit source: TV9
| Updated on: Aug 20, 2026 | 10:43 AM

अफ्रिकन देश केनियामध्ये हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या हेलिकॉप्टरमधील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. केनियाच्या साम्बुरी काऊंटीमध्ये ही घटना घडली. हेलिकॉप्टरमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुख मिशेल सेन्सी-कॉन्टुगी, त्यांची पत्नी आणि 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरला सुरुवातीला आग लागली. त्यानंतर जमिनीवर आदळून त्याचे तुकडे झाले. या घटनेनंतर तातडीने बचाव पथकाने हेलिकॉप्टरचा ढिगारा आणि सातही जाणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

केनिया नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. प्राधिकरणाच्या माहितीनुसार, केनियाची राजधानी नैरोबीच्या उत्तर भागातील सांबरू कांऊटीमध्ये सकाळी 9.13 मिनिटांच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली. हेलिकॉप्टरने लोइसाबा वन्यजीव अभयारण्यातून उड्डाण केले होते. परंतु काही वेळाने हेलिकॉप्टर कोसळून जमिनीवर आदळलं. दुर्घटना घडल्यानंतर बचाव पथक मदतीला तातडीने पोहोचू शकलं नाही. खराब हवामान आणि अंधारामुळे बचाव कार्याला विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आता सोशल मीडियावर हेलिकॉप्टर अपघाताचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केनिया रेड क्रॉसने ‘एक्स’ हँडलवर हेलिकॉप्टरचा ढिगारा असलेले व्हिडिओ आणि फोटो पाहायला मिळत आहे. हेलिकॉप्टर अतिशय दुर्गम भागात कोसळल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झालाय. विमान अपघात तपास विभागाचे संचालक फेड्ररिक कांबुगे यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेलिकॉप्टरमधील 7 जणांच्या मृत्यूला दुजोरा देण्यात आला आहे. हेलिकॉप्टरमध्ये एक पायलट एक पायलट आणि 6 प्रवासी होते. यात ५ अमिरेकी नागरिकांचा समावेश होता. दुर्गम भागात हेलिकॉप्टर कोसळल्याने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडथळे आले. तर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. स्पॅनिश भाषेचे प्रसारक टेलीमुंडो यांनी सांगितलं की, फ्लोरिडामधील त्यांचे वरिष्ठ मॅनेजर जोस अल्बर्टो सुआरेज यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. इक्वोडोरचे परिवहन मंत्री रॉबर्ट लूक यांनी या दुर्घटनेत गुप्तचर विभागाचे मिशेल सेन्सी-कोंटुगी आणि त्यांच्या पत्नीच्या मृत्यवर शोक व्यक्त केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us