AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं?

उद्योगा मंत्री उदय सामंत यांच्या नागपूर-गडचिरोली प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. टेक ऑफ घेतानाच पायलटने वेळीच बिघाड ओळखल्याने मोठी दुर्घटना टळली. सामंत यांनी स्वतः या घटनेला दुजोरा दिला असून आता ते रस्ते मार्गे गडचिरोलीकडे निघाले आहेत. या बिघाडाच्या चौकशीची मागणी स्थानिकांनी केली आहे.

मोठी बातमी ! उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं?
uday samant Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 13, 2026 | 11:02 AM
Share

राज्याचे उद्योाग मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. नागपूरहून गडचिरोलीला जात असताना हा बिघाड झाला. विमानाने टेक ऑफ घेतानाच हा बिघाड झाला. त्यामुळे उड्डाण रद्द करण्यात आलं. मात्र, सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. स्वत: उदय सामंत यांनीही विमानात तांत्रिक बिघाड झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा प्रकार पायलटच्या वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे नागपूरवरून गडचिरोली येथील सुरजागड येथे पाहणी दौरा करणार होते. या दौऱ्यासाठी त्यांनी निघण्याची तयारी केली होती. हेलिकॉप्टरमध्ये बसलेले असतानाच उड्डाणा दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं पायलटच्या लक्षात आलं. त्यामुळे पायलटने तात्काळ उड्डाण रद्द केलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, हेलिकॉप्टर उड्डाणापूर्वी तांत्रिक तपासणीत बिघाड लक्षात का आला नाही? याची चौकशी करण्याची स्थानिक शिवसैनिकांनी मागणी केली आहे.

टेक ऑफ घेतला अन्…

दरम्यान, या घटनेनंतर उदय सामंत यांनी मीडियाशी संवाद साधला. ही बातमी मीडियापर्यंत कशी पोहोचली माहीत नाही. पण बातमी खरी आहे. वस्तुस्थिती आहे. सकाळी पावणे नऊ वाजता मी नागपूरहून सूरजागडच्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी निघालो होतो. हेलिकॉप्टर स्टार्ट केल्यानंतर टेक ऑफ घेताना हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचं पायलटच्या लक्षात आलं. पायलटने वेळीच लक्ष घातल्याने आम्ही टेक ऑफच घेतला नाही. आम्ही आता बायरोड गडचिरोलीला निघालो आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

सूरजागड प्रकल्प काय आहे?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-सूरजागड विकास एक्सप्रेसची घोषणा केली होती. विदर्भातील एक्सप्रेस वेचं नेटवर्क पसरवण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. खनिज संपदेशी सरकारला जोडलं जाणार आहे. या प्रकल्पाचं काम सुरू झालेलं आहे. त्याची पाहणी करण्यासाठीच उदय सामंत गडचिरोलीला जात आहेत. सुरजागडमधील विकास कामांची पाहणी आणि उद्योगाशी संबंधित गोष्टींचा आढावा या भेटीत घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?