AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांना तात्काळ उपपंतप्रधान व्हायचंय, पण… संजय राऊत यांचा खळबळजनक दावा काय?

खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे की अमित शाह यांना तात्काळ उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, पण मोदींनी त्यांना नकार दिला. शाह संसदेत का येत नाहीत, असा सवाल राऊतांनी केला. तसेच, शिवसेना पक्ष चिन्हावरील न्यायालयीन सुनावणी देशाच्या लोकशाहीसाठी मैलाचा दगड ठरेल, असेही ते म्हणाले.

अमित शाह यांना तात्काळ उपपंतप्रधान व्हायचंय, पण... संजय राऊत यांचा खळबळजनक दावा काय?
Sanjay Raut Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 13, 2026 | 10:39 AM
Share

अमित शाह संसदेत का येत नाहीत? त्यांना कोणी रोखलं आहे? आम्ही साधे खासदार असून संसदेत येतो. अमित शाह का येत नाहीत? ते तर गृहमंत्री आहेत? असे सवाल करतानाच अमित शाह यांना तात्काळ उपपंतप्रधान व्हायचं आहे. पण मोदींनी त्यांना उपपंतप्रधान करण्यास नकार दिला आहे, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना अमित शाह हे संसदेत बोलण्यास तयार असल्याचं सांगितलं. त्यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अमित शाह खोटे बोलत आहेत. त्यांना संसदेतपासून यायला कोणी रोखलं आहे? आम्ही साधे खासदार आहोत. तुम्ही तर गृहमंत्री आहात. अमित शाहांना तत्त्काळ उपपंतप्रधान व्हायचं आहे. मोदींनी त्यांना नकार दिला. ही माझी बातमी आहे. नवीन रचनेत मला उपपंतप्रधान घोषित करा, असं अमित शाह यांनी म्हटलंय. मोदींनी त्यांना नकार दिला. मी सांगतो ते सत्य आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. मोदीनंतर अमित शाह नाही. मोदी किती काळ राहतील माहीत नाही. मूळात भाजप हा पक्ष नाही. काँग्रेस, तृणमूल, राष्ट्रवादी मिळून झालेली ती एक वसाहत आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.

न्यायालयही विचारात पडलं

यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाच्या सुनावणीवरही भाष्य केलं. सुनावणी उद्यापर्यंत सुद्धा चालू शकते. कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या वतीने संवैधानिक चौकटीत युक्तिवाद केला आहे. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्या कोणीही सत्ताधारी येईल आणि एखाद्या पक्षाचा विधीमंडळातील गट विकत घेईल आणि सत्तेत सामील करून घेईल. त्यामुळे देशातील लोकशाही आणि संविधानावर मोठं आव्हान निर्माण होईल. सिब्बल यांनी पक्ष विकत घेण्याच्या प्रक्रियेवर त्यांनी बोट ठेवलं. न्यायालय कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकून काही काळ विचारात पडलं होतं, असा दावा त्यांनी केलं.

माइलस्टोन जजमेंट येईल

या निकालाचं माइलस्टोन जजमेंट येईल. या देशात लोकशाही राहणार की नाही? मनमानी राहील की असंच राहील? या संदर्भातील निकाल अपेक्षित आहे. लोकशाही वाचवायची असेल तर सर्वोच्च न्यायालयाला तटस्थ निर्णय घ्यावा लागेल. समोरच्या पार्टीचा भर सेटिंगवर आहे. ते ठाम म्हणतात, निकाल आमच्या बाजूने लागेल. सुप्रीम कोर्ट तुम्ही विकत घेतलं आहे का? असा सवाल त्यांनी केला.

कुणी प्रॉमिस दिलं?

निकाल आमच्या बाजूने येईल असं शिंदे गट म्हणत आहे. तसं आम्हाला प्रॉमिस दिलं आहे म्हणत आहेत? कुणी प्रॉमिस दिलं? अमित शाहांनी की मोदींनी? कुणाचं प्रॉमिस आहे जाहीर करावं. न्यायालय ज्या पद्धतीने ऐकत आहे, त्या प्रमाणे वाटतं संविधानाचा विजय होईल. आम्ही मेरिटवर न्याय मागतो. कायद्यानुसार निर्णय द्या, एवढंच आम्ही मागतो, असंही ते म्हणाले.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?