AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टेन्शन… टेन्शन… टेन्शन… भारतालाही नेपाळ सारखा जलप्रलयाचा धोका? पश्चिम बंगाल डेंजर झोनमध्ये?

नेपाळ-तिबेट सीमेवरील जलप्रलयानंतर भारतालाही हिमालयीन कॅस्केडिंग आपत्तीचा धोका आहे. भूस्खलन, मुसळधार पाऊस आणि ग्लेशियर सरोवर फुटणे (GLOF) यामुळे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग आणि इतर भागांना गंभीर धोका संभवतो. तज्ज्ञांनी अशा घटनांची साखळी सुरू होऊन व्यापक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे.

टेन्शन... टेन्शन... टेन्शन... भारतालाही नेपाळ सारखा जलप्रलयाचा धोका? पश्चिम बंगाल डेंजर झोनमध्ये?
Himalayan Flood RiskImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 31, 2026 | 4:01 PM
Share

नेपाळ-तिबेटच्या सीमेवर जलप्रलय आल्यानंतर नेपाळच्या शेजारी देश सतर्क झाले आहेत. हिमालयीन क्षेत्रात कॅस्केडिंग डिझास्टर म्हणजे एकापाठोपाठ एक आपत्ती येण्याच्या गंभीर धोक्यांबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. एका वृत्तानुसार, भूकंप, बर्फ, डोंगराचे भूस्खलन, मुसळधार पाऊस किंवा ग्लेशियर सरोवर फुटणे आदी विनाशकारी घटनांची साखळी सुरू होऊन त्याचा शेकडो किलोमीटर पर्यंत परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे भारतातही असं संकट ओढवणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

नेपाळच्या लहेंडे खोला आणि भोटेकोशी नदीतील गाळ आणि ढिगाऱ्यातून बहू स्तरीय आपत्ती किती वेगाने परसरते हे सिद्ध झालं आहे. सुरुवातीला हा भूकंप असल्याचं मानलं गेलं असलं तरी अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणने केलेल्या दाव्यानुसार, 1.2 किलोमीटरच्या उंचावरून हिमस्खलन आणि दरडी कोसळल्याने 5.2 तीव्रतेच्या भूकंपा सारखे कंपन तयार झाले. त्यामुळेच ही आपत्ती ओढवली आहे.

दार्जिलिंगला इशारा

दार्जिलिंग जिल्ह्यात सिक्कीमसारख्या उंच आणि महाकाय ग्लेशियर सरोवरे नाहीत. पण तरीही हा भाग त्याच नाजूक आणि भूगर्भीयरित्या अस्थिर हिमालयीन तंत्राचा भाग आहे. दार्जिलिंग हा हायरिस्क समजल्या जाणाऱ्या IV मध्ये येतो. या ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के बसल्यास डोंगराच्या उतराचा भाग हलू शकतो. त्यामुळे नद्यांचे रस्ते ब्लॉक होऊ शकतात.

मुसळधार पाऊस आणि कमकुवत डोंगरामुळे भूस्खलन वारंवार होतात. ऑक्टोबर 2025मध्ये 12 तासाच्या आत 300 मिमीहून अधिक पावसामुळे व्यापक भूस्खलन झाला आणि ढिगारा वाहू लागला. त्यात 24 लोकांचा मृत्यू झाला होता.

जर्नल ऑफ एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट स्टडीमध्ये दार्जिलिंग- सिक्कीम उच्चभूमी क्षेत्राला अत्याधिक संवेदनशील कॅटेगिरीत ठेवलं आहे.

उतार असलेल्या डोंगराळ भागातून दरडी किंवा हिमनग कोसळतो. त्यामुळे जो ढिगारा तयार होतो तो थेट नदीत येऊन आदळतो आणि नदीच्या पाण्याबरोबर तो वाहून जातो. कधी कधी तो ढिगारा नदीतच एका जागी अडून बसल्यास नदीतमध्येच एक तात्पुरतं सरोवर तयार होतं. त्याच दरम्यान मुसळधार पाऊस झाल्यास पाण्याचा स्तर वाढतो. त्यामुळे पाण्याचा दाब वाढून हा नैसर्गिक बांध फुटतो आणि पाणी खालच्या दिशेने वेगाने वाहून जातं. त्यालाच फ्लॅश फ्लड म्हटलं जातं.

बंगालला धोका

हिमालयाच्या वरच्या भागात ग्लेशियर सरोवर फुटल्याने (GLOF) त्याचा थेट परिणाम खाली असलेल्या बंगालच्या उत्तरेपर्यंत पोहोचतो. ऑक्टोबर 2023मध्ये उत्तर सिक्कीमच्या साऊथ ल्होनक सरोवर फुटल्याने तिस्ता नदीत अचानक पूर आला होता. त्यावेळी कलिम्पोंग आणि पश्चिम बंगालच्या मैदानी भागात मोठा हाहाकार उडाला होता. त्यामुळे पूल आणि राष्ट्रीय राजमार्ग वाहून गेले होते.

मॉडलनुसार. संभाव्य ग्लोफ घटना झाल्यास बंगाल-सिक्कीम सीमेच्या आसपास 10 हजाराहून अधिक लोक, 1900 इमारती, 5 पूल आणि 2 हायड्रो पॉवर प्रोजेक्ट थेट प्रभावित होऊ शकतात.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा