AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातले सर्वच गेले… कुत्रा वाचला, पाच दिवसापासून पाहतोय मालकाची वाट; काळीज हेलावून टाकणारं दृश्य; Video व्हायरल

नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयात हजारो संसार उद्ध्वस्त झाले, शेकडो लोकांचा बळी गेला आणि अर्थव्यवस्था कोलमडली. या भीषण परिस्थितीत माणसेच नव्हे, तर मुके जीवही होरपळत आहेत. व्हायरल झालेल्या एका हृदयद्रावक व्हिडिओमध्ये एक श्वान आपल्या मालकाची वाट पाहताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसापासून तो मालकाच्या पडक्या घरासमोर मालकाची वाट पाहत उभा आहे. पण घरातील कोणीच वाचलं नाही, हे या मुक्या जीवाला माहीतच नाहीये.

घरातले सर्वच गेले... कुत्रा वाचला, पाच दिवसापासून पाहतोय मालकाची वाट; काळीज हेलावून टाकणारं दृश्य; Video व्हायरल
dogImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 31, 2026 | 1:09 PM
Share

नेपाळचा पूर ओसरल्यानंतर आता या पुराची भीषणता समोर येत आहे. धक्कादायक वास्तव समोर येत असल्याने अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत. अशातच सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हा कुत्रा पडझड झालेल्या घरासमोर गेल्या पाच दिवसापासून केविलवाणा उभा आहे. घर पडलंय. घरातील एकही माणूस वाचला नाही. घरात आणि घराच्या बाहेर चिखलाचं साम्राज्य झालंय. पण त्या बिच्चाऱ्या श्वानाला याची कल्पनाच नाही. तो पाच दिवस झाले आपल्या मालकाची वाट पाहत आहे. आज किंवा उद्या मालक येईल या आशेवर तो घरासमोर आशाळभूत नजरेने पाहत आहे. सोशल मीडियावर या कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकांना हुंदके आवरणं कठिण झालं आहे.

नेपाळमधील महाप्रलय हा शतकालीत सर्वात मोठा प्रलय असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रलयाने नेपाळची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या लोकांना गमावलं आहे. रक्ताची नाती आपल्या डोळ्यासमोर वाहून जाताना पाहून अनेकांच्या हृदयाचा थरकाप उडाला आहे. या धक्क्यातून लोक अजून सावरलेले नाहीयेत. अशातच एका व्हिडिओने सर्वांना पुन्हा एकदा हादरवून सोडलं आहे. माणसंच नाही तर मुक्या जीवांवरही कशी आपत्ती ओढवलीय हे सांगणारा हा व्हिडीओ आहे.

काय दिसतंय व्हिडीओत?

नेपाळच्या बेट्रावती भागातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत सर्वत्र चिखल दिसतोय. कोलमडलेलं घर, घरांचे आवशेष दिसतात. मोडून पडलेला संसार दिसत आहे. भांडी आणि कपडे दिसत आहेत. आजूबाजूला चिखलाचं साम्राज्य आणि पाणीच पाणी दिसत आहे. आसपास चिटपाखरूही दिसत नाही. नावालाच एखाद दुसरा माणूस दिसत आहे. कधीकाळी याच घरात हा कुत्रा बिनधास्त वावरत होता. आपल्या मालकासह घरातील प्रत्येकासोबत बागडत होता. घरासमोरच्या अंगणात मनसोक्त विहारत होता.

पण आज हा कुत्रा एकटाच या पडक्या घराबाहेर बसलेला आहे. गेल्या पाच दिवसापासून अन्नपाण्याशिवाय तो घराच्याबाहेर थांबला आहे. आपला मालक आज किंवा उद्या येईल. आपल्याला बिस्किट देईल. गोंजारेल असं त्याला वाटत आहे. त्याच आशेने तो घरासमोर बसलेला आहे. आपला मालक आणि घरातील सर्वांचाच मृत्यू झालाय याची या मुक्या जीवाला कल्पनाही नाहीये. काय संकट येऊन गेलं याचा मागमूसही या जीवाला नाहीये. त्याची नजर फक्त भिरभिरतेय. येणाऱ्या जाणाऱ्यांकडे तो एकटक पाहतोय. आपला मालक आता येईल, नंतर येईल याची त्याला आशा लागलेली आहे. कधी त्या चिखलाच्या ढिगाऱ्याकडे तर कधी अंधाऱ्या पडक्या घराकडे त्याची नजर जातेय. मालक येईल हीच त्याला एकमेव आशा आहे.

गेल्या पाच दिवसापासून हा कुत्रा उपाशी आहे. काहीच खालेल्लं नाही. अन्नाच्या शोधात तो जागू सोडायला तयार नाही. आपला मालक आला तर? असं त्याला राहून राहून वाटत असावं. म्हणूनच तो जगण्यासाठी चक्क चिखल खाताना दिसत आहे. त्याचा चिखल खातानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ते पाहून अनेकांच्या काळजात धस्स होतेय. हुंदके आवरणं कठिण होतंय.

कमेंट काय?

या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स येत आहेत. मुक्या जीवाला वाचवलं पाहिजे, असं लोक सांगत आहे. चिखल खात बसलेल्या या मुक्या प्राण्यासाठी अन्न पदार्थाची सोय करा. माणसांप्रमाणेच कुत्र्यांचेही जीवन तितकेच महत्त्वाचे आहे, असं नेटकरी म्हणत आहेत. एका नेटकऱ्यांनी या श्वानासाठी प्रार्थनाही केली आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप