AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flash Flood : चिखलात 50 कोटीत सोनं, आणि दीड कोटींच्या नोटा, नेपाळमध्ये पुराच्या गाळात खजिना

नेपाळमधील भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरात कृषी विकास बँकेची त्रिशुली शाखा पूर्णपणे बुडाली होती. पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी गाळातून ५० कोटींचे सोने, दीड कोटी रोकड, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित बाहेर काढल्या. ८ तासांच्या बचावकार्यानंतर हा 'खजिना' वाचवण्यात यश आले.

Flash Flood : चिखलात 50 कोटीत सोनं, आणि दीड कोटींच्या नोटा, नेपाळमध्ये पुराच्या गाळात खजिना
Nepal FloodImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 31, 2026 | 1:19 PM
Share

नेपाळच्या भोटेकोशी नदीला महापूर आला आहे. या महापुरात मोठा हाहा:कार उडाला आहे. महापुराचे पाणी नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशुली परिसरातील कृषी विकास बँकेच्या शाखेतही घुसले होते. त्यामुळे संपूर्ण बँक पाण्यात बुडाली. पाच दिवसानंतर पाणी ओसरल्यावर बँकेच्या आत फसलेल्या कोट्यवधीच्या संपत्तीला सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या बँकेतून पोलिसांनी 50 कोटीचं सोनं आणि दीड कोटींच्या नोटा जप्त केल्या आहेत. बँकेत प्रचंड गाळ साचल्याने गाळात खोके अडकून पडले होते. त्यात हे सोनं होतं, अशी माहिती देण्यात आली आहे.

नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापूर आल्यानंतर कृषी विकास बँकेच्या त्रिशुली-ढुंगे शाखेला मोठा फटका बसला आहे. पणी, गाळ आणि मातीच्या प्रचंड ढिगाऱ्यामुळे बँकेच्या लॉकरपर्यंत पोहोचणं कठिण होतं. स्थानिक पोलिसांनी तब्बल 8 तास या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन केलं. संपूर्ण गाळ उपसून काढला. त्यानंतर बँकेच्या आत ठेवलेलं किमती सोनं आणि दीड कोटींची रोख रक्कम पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभियानातून 50 कोटी नेपाळी मूल्याचं सोनं, सुमारे दीड कोटी नेपाळी रोकड, चांदी आणि अन्य किमती वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय बँकेतील महत्त्वाचे दस्ताऐवज सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहेत.

खजिना मिळवणं आव्हानच

भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे नेपाळमधील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रचंड पुरामुळे रस्ते आणि आसपासचे परिसर जलमग्न झाले होते. अनेक ठिकाणी पाण्याचे पाणी भरले आणि ढिगारा भरल्याने मदत कार्यात अडचणी येत आहेत. या संकटाच्या काळात त्रिशूली येथील बँकेच्या शाखेत असलेली करोडोची संपत्ती सुरक्षितपणे बाहेर काढणं प्रशासनासाठी आव्हान होतं.

बँकेच्या शाखेत पाणी भरल्याने त्या ठिकाणी असलेले सोने, चांदी आणि रोकड तसेच महत्त्वाचे दस्ताऐवज सुरक्षित बाहेर काढणं हे मोठं आव्हान होतं. बचाव पथकाने जीवमुठीत घेऊन बँकेच्या आत मोठं अभियान सुरू केलं. एक एक करून महत्त्वाचा खजिना बाहेर काढला.

तब्बल 8 तास पोलीस राबत होते. पोलिसांनी सर्व गाळ उपसला आणि देशाची महत्त्वाची संपत्ती बाहेर काढली. त्यामुळे बँक अधिकारी आणि प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तथापि, भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे नेपाळसमोर पुन्हा एकदा मोठं संकट उभं राहिलं आहे. अशा संकटात मदत कार्य करण्यास यंत्रणा अपुऱ्या पडत असल्याने आगामी काळात नेपाळला यावर काम करावं लागणार आहे.

781 लोकांचा मृत्यू

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी गेल्या पाच दिवसांपासून नेपाळमध्ये आलेल्या नैसर्गिक संकटावर कशा प्रकारची मात करण्यात आली. मदत कार्य कसं सुरू आहे, पुनर्वसनाची प्रक्रिया कशी सुरू आहे आणि आतापर्यंत काय काय घडलं? याची माहिती शेअर केली आहे. नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरात किती आर्थिक नुकसान झालं. भौतिक नुकसान किती झालं याची माहिती जमा केली जात आहे. तसेच अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याचं काम सुरू असल्याचं बालेन शाह यांनी म्हटलं आहे. नेपाळच्या नैसर्गिक प्रलयात आतापर्यंत 781 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा