Valdimir Putin : असा बॉम्ब कोणाकडेच नाही, पुतिन यांनी जगाला दाखवला सर्वात खतरनाक पोसीडॉन अणूबॉम्ब, काय आहे यात खास?

Valdimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी जगाला, त्यांच्याकडे असलेलं सर्वात खतरनाक अस्त्र पोसीडॉन अणूबॉम्ब दाखवला. या अणूबॉम्बची खासियत काय आहे? भारताकडे असलेल्या अणूबॉम्बची रेंज किती आहे? या बद्दल जाणून घ्या.

Valdimir Putin : असा बॉम्ब कोणाकडेच नाही, पुतिन यांनी जगाला दाखवला सर्वात खतरनाक पोसीडॉन अणूबॉम्ब, काय आहे यात खास?
Valdimir Putin
| Updated on: Oct 30, 2025 | 2:45 PM

रशियाने अलीकडेच जगातील सर्वात शक्तीशाली अणवस्त्र पोसीडॉन टॉरपीडोची यशस्वी चाचणी केली. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलीकडेच हा दावा केला. युक्रेन युद्धातील जखमी सैनिकांना भेटण्यासाठी पुतिन गेले होते. त्यावेळी त्यांनी पोसीडॉनच्या यशस्वी चाचणीची माहिती दिली. जगात अशा प्रकारचं दुसरं कुठलं घातक अणवस्त्र नाहीय, असं सुद्धा पुतिन यांनी सांगितलं. रशियाचं आतापर्यंतच सर्वात खतरनाक मिसाइल सरमतपेक्षाही पोसीडॉन घातक असल्याचं म्हटलं जात आहे. पुतिन यांचा हा पोसीडॉन अणूबॉम्ब भारत आणि अमेरिकेकडे असलेल्या अणवस्त्रांपेक्षा किती वेगळा आहे?

पोसीडॉन एक न्यूक्लियर-पावर अंडरवॉटर ड्रोन टॉरपीडो आहे. पाणबुडीमधून हे अणवस्त्र डागलं जातं. याचं वैशिष्ट्य म्हणजे यात न्यूक्लियर फ्यूल यूनिट असतं. म्हणजे वारंवार इंधन भरण्याची गरज पडत नाही. म्हणूनच पोसीडॉन अमर्यादीत अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर प्रहार करु शकतं. रशियाची सरकारी एजन्सी TASS नुसार, हे टॉरपीडो 1 किलोमीटरपेक्षा जास्त खोल समुद्रातून मार्गक्रमण करु शकतं. 70 नॉट्स (जवळपास 130 किमी/तास) वेगाने पाण्यातून लक्ष्याच्या दिशेने जाऊ शकतं. पोसीडॉन जवळपास अदृश्य असतं.

पोसीडॉन 30 मिनिटात काय करु शकतं?

पोसीडॉन टॉरपीडोमध्ये दोन मेगाटनापर्यंतच अणवस्त्र वॉरहेड बसवता येऊ शकतं. याच्या स्फोटाने समुद्रात इतक्या तीव्र रेडियोएक्टिव लहरी येतात, त्याने किनाऱ्यावरील शहरं राहण्यालायक राहत नाहीत. लंडनसारख्या 6 मोठ्या शहरांना अवघ्या 30 मिनिटात पोसीडॉन उद्धवस्त करु शकतं असं रशियन सैन्याचा दावा आहे.

भारताच्या अणवस्त्राची रेंज काय?

भारताकडे सध्या जवळपास 6000 किलोमीटर रेंज असलेलं इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल (ICBM) अग्नि-5 आहे. तेच अमेरिकेकडे 13000 किलेमीटर रेंजची मिसाइल्स आहेत. कुठल्याही उपखंडापर्यंत हल्ला करण्यास हे मिसाइल सक्षम आहे. पण रशियन पोसीडॉन दोन वेगवेगळ्या श्रेणीमध्ये येतं. हे मिसाइल नाही, समुद्राच्या खाली चालणारं अणवस्त्र ड्रोन आहे. याची गती आणि लपण्याची क्षमता शत्रुसाठी अदृश्य धोका बनते.

एका आठवड्यातील हे दुसरं मोठं यश

रशियासाठी एका आठवड्यातील हे दुसरं मोठं यश आहे. याआधी त्यांनी 21 ऑक्टोंबर रोजी जगातील पहिल्या न्यूक्लियर पावरवर चालणाऱ्या क्रूज मिसाइल बुरेवस्तनिक-9M739 ची यशस्वी चाचणी केली. त्यावेळी या मिसाइलची रेंज अनलिमिटेड असल्याचा दावा करण्यात आलेला. बुरेवस्तनिक (9M730) एक क्रूज मिसाइल आहे. सामान्य इंधनाशिवाय न्यूक्लियर रिएक्टरवर ही मिसाइल चालते.