AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAF Vs PLAAF: भारतीय वायुसेनेने मागे टाकल्याने, चीनचा चांगलाच तिळपापड, एअर पॉवर रँकिंगवर केली टीका…

ग्लोबल एअर पॉवरमध्ये भारतीय हवाई दलाला (IAF) चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सच्या (PLAAF) वर स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे चीनचा चांगलाच तिळपापड झाला आहे.

IAF Vs PLAAF: भारतीय वायुसेनेने मागे टाकल्याने, चीनचा चांगलाच तिळपापड, एअर पॉवर रँकिंगवर केली टीका...
xi jinping
| Updated on: Jul 13, 2026 | 6:31 AM
Share

वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट (WDMMA) या संस्थेने साल २०२६ साठीची जागतिक वायूसेनेची ताकद असलेल्या देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे. अवाढव्य भूभाग आणि अक्राळविक्राळ सैन्यदल पदरी बाळगणाऱ्या चीनच्या वायू दलाचा नंबर भारतीय वायू दलाच्या खाली घसरल्याने चीनचे धाबे दणाणले आहेत. आपण भारतापेक्षा हवाई शक्तीत कमी कसे पडलो या विचाराने चीनची झोपच उडाली आहे. पाकिस्तानचे तर टॉप-१० मध्ये नामोनिशान नाहीए…

WDMMA संस्थेने आपली जगातील ताकदवान वायू दल असणाऱ्या देशांची क्रमवारी जाहीर केली आहे.ग्लोबल एअर पॉवरमध्ये भारतीय वायू दलाचा (IAF) क्रमांक ६ वा आला आहे.तर चीनच्या वायू दलाचा क्रमांक भारताच्या खाली ७ वा आला आहे. या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सच्या (PLAAF) ला अशा प्रकारे भारतीय वायू दलापेक्षा कमी गुण दिल्याने चीनमध्ये हडकंप उडाला आहे. चिनी तज्ज्ञ आणि ग्लोबल टाइम्सने या क्रमवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. चीनच्या संरक्षण तज्ज्ञांनी आणि सरकारी माध्यमांनी या संस्थेच्या गुणपद्धतीवर प्रचंड टीका केली आहे. ही क्रमवारी सदोष असून ती चीनच्या लष्करी ताकद किंवा युद्धासाठीच्या वास्तविक तयारीला अचूकपणे नोंदवू शकलेली नाही अशी टीका चीनच्या ग्लोबल टाइम्सने या सरकारी वृत्तपत्राने केली आहे.

IAF  सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी हवाई शक्ती

‘वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट’ नुसार, भारतीय वायुसेना ( IAF ) ही जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी हवाई शक्ती म्हणून उदयास आली आहे.

पहिला क्रमांक १ ) अमेरिकन वायुसेना,

दुसरा क्रमांक २) अमेरिकन नौदल,

तिसरा ३ ) रशियन वायुसेना,

चौथा ४ ) अमेरिकन लष्कर आणि

पाचवा ५ वा क्रमांक अमेरिकन मरीन यांना मिळाला आहे.

तर सहावा क्रमांक ६ ) भारतीय वायुसेना ( IAF ) दिला आहे.

७ ) चीनची ‘पीएलएएएफ’ (PLAAF) सातव्या स्थानावर आहे,

तर पाकिस्तानची वायुसेना १८ व्या स्थानावर ढकलली गेली आहे.साल २०२२ पासून सलग पाचव्यांदा भारतीय वायुसेनेने ‘पीएलएएएफ’च्या वरचे स्थान मिळवले आहे हे विशेष…

चीनी अधिकारी म्हणाले ही पद्धत अपुरी

लष्करी सामर्थ्य मोजण्यासाठी संगणकीय अल्गोरिदम आणि बाह्य मूल्यांकन पद्धती ही अपुरी साधने आहेत. खरी कसोटी प्रत्यक्ष युद्धाची तयारी आणि प्रत्यक्ष कारवाया आणि प्रत्यक्ष लढाईतील कामगिरी यामधूनच निश्चित केली जाऊ शकते असे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) नौदलाचे माजी अधिकारी झांग जुन्शे यांनी म्हटले आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक