AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचे पुन्हा आखातात थैमान, भात्यात थरकाप उडवणारी क्षेपणास्रे, तुम्ही यादी एकदा पहाच..

इराण आणि अमेरिकेची शांतता चर्चा आता बासनात गुंडाळली गेली आहे. आता दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करुन शांतता कराराला केराच्या टोपलीत टाकले आहे.

इराणचे पुन्हा आखातात थैमान, भात्यात थरकाप उडवणारी क्षेपणास्रे, तुम्ही यादी एकदा पहाच..
Iran back on the battlefield
| Updated on: Jul 13, 2026 | 6:25 AM
Share

इराणने आमच्या जहाजांना टार्गेट केल्याने सीजफायर समाप्त झाल्याचे सांगत अमेरिकेने इराणवर मोठे हल्ले केले आहेत, त्यानंतर आता इराणने देखील त्यांचे दिवंगत सुप्रीमो आयातुल्ला अली खामेनी यांच्या ‘सुपूर्द ए खांक’ सोहळा संपताच हल्ले सुरु केले आहेत. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने ( IRGC ) अमेरिकन सैन्य अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्याचे फुटेज रविवारी जारी केले. यात इराणने अत्यंत घातक अशा कद्र, एमाद, खैबर शेकन, फतेह-110 आणि जोल्फागार या अत्याधुनिक बॅलेस्टीक मिसाईलचा वापर केला आहे.

मिसाईलची क्षमता आणि भेदक शक्ती

कद्र मिसाईल:

मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक मिसाईल – रेंज 1800 ते 2000 किलोमीटर – 650 ते 1000 किलोग्राम वॉरहेड- तरल आणि ठोस इंधनाचे मिश्रण – अचूक मारा- महत्वाच्या टार्गेटना उद्धवस्त करते

एमाद मिसाइल:

मध्यम पल्ल्याचे मिसाईल – रेंज सुमारे 1700 किलोमीटर – यात 750 किलोग्राम पेलोड – यात मॅन्यूव्हरेबल री-एंट्री व्हीईकल (MARV)- जी लक्ष्याने दिशा बदलली तर स्वत:ची दिशा बदलून पाठलाग करते -एअर डिफेन्स सिस्टीमला चकवा देते

खैबर शेकन:

घन इंधन – वेगाने डागता येते – रेंज 1450 किलोमीटर – वॉरहेड 450-600 किलोग्राम – मॅन्यूव्हरेबल वॉरहेड – शत्रूंचे मिसाईल डिफेन्स भेदण्यास सक्षम

फतेह – 110:

लघू पल्ल्याची मिसाईल – रेंज 300 किलोमीटर, वॉरहेड सुमारे 450-500 किलोग्राम- घन इंधनाने मोबाईल आणि वेगवान- अचूक हल्ल्यासाठी वापर

जोल्फागार:

फतेह कुटुंबातीलच अत्याधुनिक मिसाईल – रेंज 700 किलोमीटर- वॉरहेड 450-600 किलोग्राम- घन इंधन – सबमुनिशन वॉरहेड – ज्यामुळे एकच मिसाईल अनेक छोटे-छोटे विस्फोट करते.

या मिसाईल हल्ल्यांच्या शिवाय इराणने अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोनने देखील हल्ले केले आहेत. त्यामुळे कमी उंचीवर उडून ड्रोनने कमी अंतरावर मात्र अधिक घातक आणि प्रभावी हल्ले केले आहेत.

कसे केले हल्ले?

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) अमेरिकेचे लष्करी तळ उदा. जॉर्डन, बहारीन आदींवर हल्ला केला. घन इंधनाची मिसाईल कमी वेळात तयार करता येते. तर तरल इंधनाची मिसाईल अधिक लांबपल्ल्याला टार्गेट करते. प्रेसिजन गायडन्सने निशाना अचूक लागतो.

IRGC ने जारी केलेल्या फुटेजमध्ये मिसाईलचे लाँच आणि टार्गेट लक्ष्यभेद केल्याचे दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे इराणने शक्ती प्रदर्शन करत आपल्या तयारीचा संदेश दिला आहे. या हल्ल्यामुळे क्षेत्रात तणाव वाढू शकतो. अमेरिकेचे एअर डिफेन्स सिस्टीम उदा. पॅट्रीयट या इराणी मिसाईलना रोखण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मॅन्युवरेबल वॉरहेड आणि सॅल्वो अॅटॅक त्यांना आव्हान देत आहेत.

इराणचे शक्तीप्रदर्शन

इराण या मिसाईल हल्ल्यातून आपली क्षेत्रात ताकद दाखवू इच्छीत आहे. ही शस्रास्रे स्ट्रेट ऑफ होर्मुझची सुरक्षा आणि शत्रूंच्या बेसना लक्ष्य करण्यात उपयोगी आहेत. परंतू अमेरिकेच्या अत्याधुनिक तंत्रासमोर इराणला अनेक आव्हाने देखील आहेत. या हल्ल्याने जागतिक ऊर्जा बाजार प्रभावित झाला आणि तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे.

युद्ध वाढू शकते

तज्ज्ञांच्या मते अशा हल्ल्याने युद्धाला वाढवू शकतात. दोन्ही देश आणि उत्तरादाखल हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे इराणच्या आयआरजीसीने फुटेज जारी करणे हा देखील प्रसिद्धीचा भाग आहे, ज्यामुळे इराणच्या सरकारला देशात पाठींबा वाढू शकतो. हा हल्ला इराणच्या क्षेपणास्रांची क्षमतेचे प्रदर्शन आहे. कद्र ते जोल्फागार पर्यंत क्षेपणास्रांची वैविध्य रेंज आणि शक्तीमध्ये आहे,ज्यामुळे इराणकडे अनेक पर्याय असल्याचे इराण दाखवू इच्छीत आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक