AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकेकाळी भारताला युरेनियम देण्यास दिला नकार,आता भारतासोबतच ऑस्ट्रेलियाचा करार, कसे बदलले चित्र ?

इंडोनेशियाच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया येथे पोहचले आहेत. येथे त्यांच्या जंगी स्वागत करण्यात आले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पीएम मोदी यांनी ऑस्ट्रेलियाशी अनेक मदत्वाचे करार केले आहेत. युरेनियमचा पुरवठ्या संदर्भात देखील करार करण्यात आला. याला भारताचा मोठा विजय मानला जात आहे.

एकेकाळी भारताला युरेनियम देण्यास दिला नकार,आता भारतासोबतच ऑस्ट्रेलियाचा करार, कसे बदलले चित्र ?
PM Narendra Modi Australia visit
| Updated on: Jul 09, 2026 | 10:28 PM
Share

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान गुरुवारी युरेनियम करारावर सह्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी यावेळी  म्हणाले, “आज आम्ही अणुऊर्जेवर एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला युरेनियम पुरवठ्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे आमच्या स्वच्छ ऊर्जेच्या उद्दिष्टांना गती मिळेल.” भारत आणि ऑस्ट्रेलिया मिळून क्रिटीकल मिनरल्स कॉरिडॉर देखील विकसित करणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. कोकोस ( किलिंग ) बेटावर स्पेस ट्रॅकींग टर्मिनल तयार केला जाणार असून ज्यामुळे भारताच्या गगनयान मिशनला मदत मिळणार आहे.

मेलबर्न येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनिज यांच्याशी बैठक झाल्यानंतर संयुक्त परिषदेत संरक्षण, व्यापार, ऊर्जा, अंतराळ संशोधन आणि महत्वपूर्ण खनिज यासह अनेक क्षेत्रातील करारांची घोषणा केली. मोदी यांनी १६ वर्षांच्या मुलांना सोशल मीडिया बंदी करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाची स्तूती केली. त्यानंतर त्यांनी मेलबर्नमध्ये ३० हजार भारतीयांसमोर भाषण केले.

भारताचा ऊर्जेची गरज पाहाता हे एक मोठे पाऊल म्हटले जात आहे. कारण भारतात वीजेची मागणी मोठी आहे. कारण भारताची लोकसंख्या जास्त आहे. तर ऑस्ट्रेलियाकडे युरेनियमचे अनेक भंडार आहेत. त्याचा वापर ऑस्ट्रेलिया करत नाही. कायदेशीर अडचणी आणि राजकीय संवेदनशीलतेचा अभावाने हा व्यापार पुढे वाढू शकला नाही.

दोन्ही देशाचे संयुक्त स्टेटमेंट

दोन्ही देशांनी एक ज्वाईंट स्टेटमेंट देखील जारी करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की या सिस्टीम अंतर्गत इंटरनॅशनल एटॉमिक एनर्जी ( IAEA ) अंतर्गत सुरक्षा मानकांच्या कक्षेत केवळ शांततापूर्ण उद्देशांसाठी दीर्घकाळापर्यंत युरेनियमची निर्यात करणे सोपे होणार आहे.

ऑस्ट्रेलियाकडे जगाचे २८ टक्के यूरेनियम भंडार

ऑस्ट्रेलियाच्याकडे जगाच्या २८ टक्के युरेनियमचे भंडार आहे. हा देश न्युक्लिअर पॉवरचा वापर करत नाही ना अण्वस्रे तयार करत नाही. सगळे युरेनियम निर्णयात करतो.यामुळे १.४ अब्ज लोकसंख्येचा भारत २०४७ पर्यंत १०० गीगा वॅट न्युक्लिअर पॉवर क्षमता वाढवू इच्छीतो. त्यामुळे ६ कोटी कुटुंबाना विज मिळण्याची शक्यता आहे. भारताने गेल्या दशकात न्युक्लिअर पॉवरच्या क्षमतेला दुप्पट केले आहे. एकूण वीज निर्मितीत याचा वाटा ३ टक्के आहे. कारण युरेनियमची आपल्या देशात वाणवा आहे.

भारताला आण्विक संपन्न देशाचा दर्जा का नाही

ऑस्ट्रेलिया न्यूक्लियर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटीवर सही करणारा देश आहे. ही ट्रीटी अमेरिका, चीन, ब्रिटेन, फ्रान्स या देशांनाच आण्विक शस्रास्र संपन्न देश मानते. आणि भारता सारख्या आण्विक क्षमता असलेल्या देशाना युरेनियम विकण्यास नकार देते. ज्यांनी या करारावर सह्या केलेल्या नाहीत त्यांना युरेनियम विक्री होत नाही. भारताने या ट्रीटीला भेदभाव करणारा ट्रीटी म्हटले आहे. ही ट्रीटी त्या देशांना संपन्न देश मानत नाही, ज्यांनी १९६७ च्या आधी आण्विक उपकरणाची चाचणी केली होती. या नियमामुळे भारताला आण्विक संपन्न देशाचा दर्जा मिळालेला नाही.

आमच्या स्वच्छ ऊर्जेच्या उद्दिष्टांना गती मिळेल

माध्यमांशी बोलताना, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज म्हणाले की, या व्यवस्थेमुळे ऑस्ट्रेलियातून भारताला युरेनियमची निर्यात सुलभ होईल, ज्यामुळे जीवाश्म इंधनाशिवाय ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या विकासाला चालना मिळेल. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज आम्ही अणुऊर्जेवर एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला युरेनियम पुरवठ्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे आमच्या स्वच्छ ऊर्जेच्या उद्दिष्टांना गती मिळेल.”

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ