Javed Akhtar : दारू पिऊन आयुष्यातील 15 वर्षे…80 वर्षांच्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना जावेद अख्तर यांना होतोय मोठा पश्चात्ताप
गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी त्यांच्या दारूच्या व्यसनासंदर्भातील भूतकाळातील अनुभव आणि खंत व्यक्त केली. दारूच्या नशेत त्यांच्याकडून बऱ्याच चुका झाल्या. जवळपास 80 वर्षांच्या आयुष्यातील 15 वर्षे दारूमुळे वाया गेली.

गीतकार आणि लेखक जावेद अख्तर हे त्यांच्या गायनाप्रमाणेच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी दारूच्या व्यसनाविरूद्ध कशी लढाई लढली, व्यसनाला कसे हरवले याबद्दल खुलासा केला, तेव्हा ते म्हणाले एक असा काळ होता जेव्हा ते खूप दारू प्यायचे, एका दिवसात संपूर्म बॉटल संपवायचे. ते त्यांच्या या व्यसनाबद्दल कसे लढले. त्यांनी काय सांगितले जाणून घ्या.
अलिकडच्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी आपल्या आयुष्यातील त्या कठीण काळाची आठवण सांगितली आणि पश्चात्ताप व्यक्तही केला. द मोजो स्टोरी वर बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की मला खूप पश्चात्ताप होतो. पुढे ते म्हणाले की एका निरोगी व्यक्तीसाठी पश्चात्ताप होणे स्वाभाविक आहे. कारण त्यामुळे आयुष्याकडे मागे वळून पाहण्याची आणि दारू पिण्याऐवजी काय वेगळे करता आले असते. याचा आता विचार डोक्यात येत आहेत.
मी एकटाच जवळजवळ दररोज रात्री एक बाटली प्यायचो
जेव्हा त्यांच्या दारूच्या व्यसनाबद्दल चर्चा सुरू झाली तेव्हा अख्तरने लगेचच स्पष्ट केले की त्याला ते आता जेव्हा त्याच्या दारूच्या व्यसनाबद्दल चर्चा सुरू झाली, तेव्हा अख्तर यांनी लगेचच स्पष्ट केले की तो आता त्याला लढाई मानत नाही. “मी त्यावर विजय मिळवला आहे. मग लढाई कुठे आहे?” असे ते म्हणाले म्हणाला. अख्तर पुढे म्हणाले की जवळजवळ एक वेळेला ते संपूर्ण बॉटल संपवायचे. मी नियमितपणे आणि खूप जास्त प्रमाणात दारू प्यायचो. मी एकटाच जवळजवळ दररोज रात्री एक बाटली प्यायचो.
आणि 1991 साली 31 जुलै रोजी, मी शेवटची दारू प्यायलो आणि त्यानंतर आजपर्यंत मी दारूच्या एका थेंबालाही स्पर्श केलेला नाही आणि आता मी ते कधीही करणार नाही. असे अख्तर म्हणाले. दारूमुळे मी खूप चुकीचे निर्णय घेतले, मी बऱ्याच लोकांशी वाईट वागलोय. पुढे त्यांनी कबुल केले की त्याच्यांकडून दारूच्या नशेत अनेक मोठ्या चुका झाल्या आहेत. आपल्या 80 वर्षांच्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना , अख्तर यांना वाटते की त्यांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे आणि त्यांच्या तेव्हाच्या बेजबाबदार वृत्तीमुळे त्यांनी जवळपास 15 वर्षे गमावली. असे जावेद अख्तर यांनी सांगितले. त्यांनी तो काळ नवीन कौशल्य, भाषा शिकण्यात, लोकांप्रती संवेदनशील राहण्यात घालवता आला असता. असे त्यांनी स्पष्ट केले.
आणि 1991 साली 31 जुलै रोजी, मी शेवटची दारू प्यायलो
अखेर त्यांना कशा प्रकारचे जीवन जगायचे आहे?, याबद्दलच्या निवडीतून त्यांनी दारू सोडण्याचा पर्याय निवडला. जेव्हा मी दारू पीत होतो ते मी माझ्या दुखी बालपणामुळे नाही तर मला दारू पिण्यात आनंद मिळत होता म्हणून पीत होतो, असे अख्तर यांनी सांगितले. पण मग एकतर मी हा आनंद घेत मी एकतर 52,53 वर्षापर्यंत जगेन आणि मग मरेन. त्यावेळी मी स्वत:ला 10 ते 12 वर्षे दिली. जर मला जगायचं असेल तर मला दारू सोडावीच लागेल असे ठरवले आणि दारू सोडली. असे जावेद अख्तर यांनी स्पष्ट केले. आणी 31 जुलै, 1991 रोजी अख्तरने दारू सोडण्याचा घेतलेला निर्णय हा त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला
आपल्या पश्चात्तापासोबतच, अख्तर यांच्या विचारांमधून हेदेखील अधोरेखित होते की, तीन दशकांपूर्वी घेतलेला एक निर्णय आजही त्यांच्या जीवनदृष्टीला आकार देत आहे. वयाच्या ८० व्या वर्षीही ते चित्रपट, साहित्य, गीतलेखन आणि सामाजिक समस्यांवरील चर्चांमध्ये सक्रिय आहेत, तसेच प्रेक्षकांसोबत आपले अनुभव शेअर करत आहेत.
