AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचे 3 एफ-15 फायटर जेट इराणने नाही पाडले तर मग कोणी पाडले? युद्धात मोठा ट्विस्ट

अमेरिका इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज युद्धाचा तिसरा दिवस आहे. युद्धाच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे तीन फायटर जेट्स पाडण्यात आले होते, यामध्ये आता मोठं ट्विस्ट आलं आहे.

अमेरिकेचे 3 एफ-15 फायटर जेट इराणने नाही पाडले तर मग कोणी पाडले? युद्धात मोठा ट्विस्ट
अमेरिकेचे फायटर जेट कोणी पाडले?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 02, 2026 | 6:40 PM
Share

कुवेतमध्ये अमेरिकेचे तीन फायटर जेट पाडल्याचा दावा इराणकडून करण्यात आला होता, दरम्यान यावर आता अमेरिकेची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. अमेरिकेचे फायटर जेट हे इराणने नाही तर कुवेतच्या एअर डिफेन्स सिस्टमने चुकून पाडले असं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान यापूर्वी इराणकडून मोठा दावा करण्यात आला होता, कुवेतमध्ये अमेरिकेचे तीन फायटर जेट पाडल्याचा दावा इराणने केला होता. तर अमेरिकेचे फायटर जेट पाडल्याच्या वृत्ताला कुवेतने देखील दुजोरा दिला होता.

कुवेतने आपल्या दाव्यामध्ये काय म्हटलं होतं?

अमेरिकेचे फायटर जेट पाडल्यानंतर कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाकडून एक अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलं होतं. ज्यामध्ये कुवेतने म्हटलं होतं की युद्धाच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे तीन फायटर जेट पाडण्यात आले आहेत. या सर्व विमानातील पायलट सुरक्षित असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर कुवेतमधून एक व्हिडीओ देखील समोर आला होता, ज्यामध्ये अमेरिकेचे फायटर जेट पाडण्यात आल्यानंतर त्यामधील पायलटला रुग्णालयात नेत असताना दिसत आहे. आम्ही अमेरिकन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि आम्ही पुढील योजना बनवत आहेत, असंही कुवेतने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान कुवेतमध्ये अमेरिकन सैन्याची तळं आहेत, त्यामुळे आता इराणने कुवेतला देखील लक्ष्य केलं आहे. युद्धाच्या दुसऱ्या दिवशी इराणने कुवेतवर जोरदार हल्ला केला, कुवेतमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दुतावासाला इराणकडून टार्गेट करण्यात आलं. त्यानंतर देखील इराणने कुवेतवर अनेक मिसाईल हल्ले केले. याचदरम्यान अमेरिकेचे तीन फायटर जेट एफ-15 पाडण्यात आले होते. ते फायटर जेट आपण पाडल्याचा दावा इराणने केला होता, मात्र त्यानंतर आता अमेरिकेकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, कुवेतच्या एअर डिफेन्स सिस्टमने चुकून विमान पाडल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. त्यामुळे आता हे फायटर जेट इराणने पाडले नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान इराणकडून देखील अमेरिका आणि इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...