अमेरिकेचा एक निर्णय धाडकन वाढल्या कच्च्या तेलाच्या किंमती, भारताचे टेन्शन वाढले, थेट..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यातच अमेरिकेने अत्यंत घातक पाऊल उचलल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेच्या या निर्णयाने एकच खळबळ उडाली. ज्यामुळे तेलाच्या किंमती गगणाला पोहोचल्या आहेत.

अमेरिकेचा एक निर्णय धाडकन वाढल्या कच्च्या तेलाच्या किंमती, भारताचे टेन्शन वाढले, थेट..
Donald Trump
| Updated on: Nov 03, 2026 | 9:09 AM

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यातच जगाला ज्याची भीती तेच पाऊल अमेरिकेकडून उचलण्यात आले. अमेरिकेने पुन्हा इराणसोबत युद्ध सुरू केले. इराणवर अमेरिकेने मोठा हल्ला केला. अमेरिकेने आज सकाळीच इराणवर हल्ला केला. वॉल स्टीट जर्नलने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सांगितले की इराणच्या केशम व्दिपवर हल्ला करण्यात आला. अमेरिकेकडून हा हल्ला अत्यंत गुप्तपणे करण्यात आला. अमेरिकेने कोणत्याही प्रकारचे युद्ध सुरू केले, याची माहिती अमेरिकेला कळू द्यायची नसल्याने त्यांनी अत्यंत गुप्तपणे हा हल्ला केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी कच्च्या तेलाच्या किंमती 10 डॉलरपर्यंत कमी झाल्याची पोस्ट शेअर केली. पण अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यानंतर पुन्हा कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, कच्च्या तेलाच्या किंमती 10 डॉलरपर्यंत खाली आल्या. लोकांना वाटत आहे की, हे युद्ध थांबले आहे. इराणला कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकरत युद्धविराम करार हवा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारीच म्हटले होते की, इराणवर कोणताही हल्ला केला जाणार नाही. मात्र, त्यानंतर रात्रीच हा हल्ला करण्यात आला.

Loading...

केशम व्दिपवरील हल्ल्याची बातमी पुढे येताच कच्चे तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली. 8 महिन्यांच्या संघर्षात पश्चिम आशियातील तेल पुरवठा विस्कळीत झाला. त्यातच पुन्हा एकदा तणाव वाढत आहे. अमेरिकेतील निवडणुका होऊपर्यंत अमेरिका कोणताही हल्ला करणार नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात उलटे घडले.

अमेरिकेने अत्यंत गुप्तपणे हा हल्ला केला. या हल्ल्याने एकच खळबळ उडाली. इराणकडून अमेरिकेला युद्ध शांतता करार देण्यात आला. ज्यात आठ अटी आहेत. आता अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबते का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अमेरिका इराणवर परमाणू हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात होते. इराणवर मोठा हल्ला करण्यासाठी इस्त्रायल आग्रही आहे. इराणच्या पायाभूत सुविधांवर हल्ले व्हावेत, ही इस्त्रायलची इच्छा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us