AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND A vs NZ A : न्यूझीलंड ए विरुद्ध यशस्वी जैस्वालची वनडे स्टाइल सेंच्युरी, टीम इंडियाचं मोठं टेन्शन झालं दूर

IND A vs NZ A : न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरीज सुरु होण्याआधी टीम इंडियाचं मोठं टेन्शन दूर झालं आहे. यशस्वी जैस्वालला सूर गवसला आहे. उद्यापासून न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज सुरु होणार आहे.

IND A vs NZ A : न्यूझीलंड ए विरुद्ध यशस्वी जैस्वालची वनडे स्टाइल सेंच्युरी, टीम इंडियाचं मोठं टेन्शन झालं दूर
yashasvi jaiswal centuryImage Credit source: PTI
| Updated on: Nov 03, 2026 | 9:04 AM
Share

Yashasvi Jaiswal Century in IND A vs NZ A : न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरीज सुरु होण्याआधी टीम इंडियाचं सर्वात मोठं टेन्शन दूर झालं आहे. भारतीय संघाला यशस्वी जैस्वालच्या फॉर्मची चिंता होती. मागच्या काही कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालकडून अपेक्षित धावा झाल्या नव्हत्या. 9 पैकी चार डावात तो खातही उघडू शकला नव्हता. पण आता यशस्वी फॉर्ममध्ये परतला आहे. न्यूझीलंड ए विरुद्ध क्राइस्टचर्च येथे सुरु असलेल्या दुसऱ्या अनऑफिशियल टेस्ट मॅच मध्ये यशस्वीने शानदार शतक झळकावलं. कसोटीच्या शेवटच्या दिवशी यशस्वीने ही सेंच्युरी केली. यशस्वीने शतक तर झळकवलच पण फर्स्ट क्लास क्रिकेटमधील आपल्या 5000 धावा सुद्धा पूर्ण केल्या.यशस्वी जैस्वालने न्यूझीलंड ए विरुद्ध 119 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. शतकाच्या उंबरठ्यावर 99 धावांवर असताना त्याने सिक्स मारुन शतक पूर्ण केलं. यशस्वीचं फर्स्ट क्लास करिअरमधील हे 18 वं शतक आहे. या शतकी इनिंगसह यशस्वीने फर्स्ट क्लास क्रिकेटमधील आपल्या 5000 धावा पूर्ण केल्या. 56 व्या फर्स्ट क्लास मॅचच्या 102 व्या इनिंगमध्ये त्याने हा टप्पा गाठला.

यशस्वी जैस्वालचा शतकापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याला वेदनेचा सामना करावा लागला. इंडिया ए च्या दुसऱ्या इनिंगमध्ये 32 वी ओव्हर सुरु होती. यशस्वी 87 धावांवर खेळत असताना न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेरॉड मकॉयचा बाऊन्सर मारला. हा चेंडू थेट यशस्वीच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. चेंडू हेल्मेटवर लागल्यानंतर यशस्वीला वेदना झाल्या, तो थोडा त्रासलेला दिसला. त्याची कनक्शन टेस्ट झाली. या कनक्शन टेस्ट नंतर तो खेळण्यासाठी फिट होता.

हे शतक खास का आहे?

मागच्या नऊ इनिंगमधील आकडे लक्षात घेता यशस्वी जैस्वालने क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंड ए विरुद्ध झळकवलेलं शतक खूप खास आहे. मागच्या नऊ डावात तो चारवेळा शून्यावर बाद झाला. फक्त एकदाच फिफ्टी प्लस स्कोर आहे. या 9 पैकी तीन इनिंग तर तो न्यूझीलंड विरुद्ध खेळला. यात 21 धावा त्याने केल्या. न्यूझीलंड ए विरुद्ध चौथ्या डावात त्याने शतक झळकावलं. टीम इंडियासाठी ही चांगली बाब आहे. टी20 नंतर उद्यापासून वनडे सीरीज सुरु होतेय. त्यानंतर लगेच कसोटी मालिका आहे.

Follow Us
चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार...
Manoj Jarange Patil : चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार... मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा...
Mahayuti : महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा, मग... महेंद्र थोरवेंचं तटकरेंना थेट आव्हान
ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज....
Shivsena : ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी...
Shivsena : महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी; योगेश कदमांनी दिले संकेत
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?