AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या पक्षातील गोंधळ आम्हाला त्रासदायक, अमित शाह यांची राष्ट्रवादीतील गोंधळावर नाराजी, दिल्लीत काय घडलं?

Amit Shah on NCP: राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादाचे पडसाद दिल्लीतही उमटले. राष्ट्रवादीचे नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीतील गोंधळावर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.

तुमच्या पक्षातील गोंधळ आम्हाला त्रासदायक, अमित शाह यांची राष्ट्रवादीतील गोंधळावर नाराजी, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह यांची राष्ट्रवादीतील गोंधळावर नाराजी, दिल्लीत काय घडलं?
| Updated on: Nov 03, 2026 | 8:45 AM
Share

Amit Shah on NCP: अजितदादांच्या अकाली एक्झिटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. पक्षासमोरच नाही तर मित्रपक्षाच्या शीर्ष नेत्यांसमोरही राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते त्यांचे गऱ्हाणे मांडले आहे. यापूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि पवार कुटुंबियातील वाद समोर आला होता. आता पार्थ पवार यांच्या भूमिकेवरून पुन्हा वाद उफळला आहे. राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष पदावरील नेमणुकीवरून ठिणगी पडली आहे. हा सर्व वाद दिल्ली दरबारी सुद्धा पोहचला आहे. नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे याविषयीची तक्रार केल्यानंतर दिल्लीत बैठक झाली. त्यात शाह यांनी राष्ट्रवादीतील गोंधळावर नाराजी व्यक्त केली. यामुळे सरकारवर परिणाम होत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शाह यांचा देवगिरीसाठी थेट संदेश

झिशान सिद्दिकी आणि इतर नेमणुकीवरून राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. या नेत्यांनी आपल्याला त्यांची नियुक्ती झाल्याचे माध्यमातून कळल्याची प्रतिक्रिया दिली. पार्थ पवार यांच्या निर्णयाविरोधात नेते नाराज झाले. त्यांना अमित शाह यांची भेट घेतली. त्यात पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांची तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई अध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ते पद आणि इतर पदावर नियुक्ती करताना वरिष्ठ नेत्यांना डावलण्यात आल्याचा तक्रारीचा सूर होता. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या घरी बैठक झाली. पुन्हा कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात वरिष्ठ नेत्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.

या सर्व घडामोडींवर अमित शाह यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पक्षातील वादाचा परिणाम सरकारवर होत असल्याचा स्पष्ट संदेश देवगिरीला कळवण्यात आला. कालच्या बैठकीत सुनील तटकरे, प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि इतर नेते उपस्थित होते.

सुनेत्रा पवारांनी बोलावली आमदारांची बैठक

दिल्लीतील नाराजी नाट्याचे सूर आता मुंबईतही उमटू लागले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. गेल्या चार महिन्यानंतर अशी बैठक होत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या या बैठकीला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. आज संध्याकाळी सात वाजता देवगिरी बंगल्यावर ही बैठक होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिल्लीत, पक्षाच्या नेत्यांची आणि अमित शाह यांची भेट ही पूर्वनियोजीत असल्याचे सांगितले आहे. काही लोक मुद्दाम पक्षात दुफळी निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादीत वाद असल्याचा खोडसाळपणा करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Follow Us
चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार...
Manoj Jarange Patil : चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार... मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा...
Mahayuti : महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा, मग... महेंद्र थोरवेंचं तटकरेंना थेट आव्हान
ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज....
Shivsena : ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी...
Shivsena : महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी; योगेश कदमांनी दिले संकेत
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?