AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी भाजप समर्थक…सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांचं मोठं विधान, सीजेपीवरही महत्त्वाचं बोलले

सप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांचं काँग्रेस आणि भाजपवर मोठं विधान केलं. यावेळी त्यांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केली. त्यांनी काँग्रेस, भाजपसहित विविध राजकीय पक्षावर टीका केली.

मी भाजप समर्थक...सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांचं मोठं विधान, सीजेपीवरही महत्त्वाचं बोलले
retired judge Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 03, 2026 | 8:25 AM
Share

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी सर्व राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे. मला भारतातील कोणताही राजकीय पक्ष आवडत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी अभिजीत दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीची देखील खिल्ली उडवली. त्यांनी भाजप आणि काँग्रेसचा उल्लेख केला. मी काँग्रेस आणि इतर पक्षाचा टीकाकार असलो तरी भाजपचा समर्थक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काटजू यांनी म्हटलं की, मी अनेकदा काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षावर टीका केली आहे. त्यामुळे अनेकांना मी भाजपचा समर्थक वाटतो. परंतु हे चुकीचं आहे. मी काँग्रेस, भाजपसहित सर्व राजकीय पक्षांच्या विरोधात आहे. मी त्यांना निरुपयोगी मानतो. त्यांना फक्त सत्ता आणि पैसा हवा आहे. या राजकीय पक्षांना जनतेशी प्रेम नाही’.  असं म्हणत माजी न्यायाधीशांनी राजकीय पक्षाच्या मतदान मागण्याच्या पद्धतीवरही आक्षेप घेतला.

‘आताचे राजकीय पक्ष हे समाजात फूट, दोन समाजात तेढ, द्वेष पसरवण्याचे कार्य करतात. मला विश्वास आहे की, भविष्यात देशभक्त, आधुनिक विचारांचे, धर्मनिरपेक्ष नेते समोर येतील. भारताच्या नव्याने उभारणीसाठी जन आंदोलनाचं नेतृत्व करतील,असे माजी न्यायाधीशींनी सांगितलं. त्यांनी पुढे सांगितलं की, देश संकटात येतो, त्यावेळी नवी नेते समोर येतात. खरंतर अशा नेत्यांना आधी कोणीच ओळखत नसतं. उदाहरण म्हणजे इंग्लंडमध्ये ऑलिव्हर क्रॉमवेल, 1789 साली फ्रान्समध्ये रॉबेस्पियर, 1917 साली रशियामध्ये लेनीन यांची एन्ट्री झाली. परंतु नव्या नेतृत्वाला वेळ लागतो. आतापर्यंत भारतात नवा नेता अजून उदयास आलेला नाही. मला खात्री आहे की, एक दिवस नक्कीच उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काटजू यांनी मागील एका पोस्टमध्ये कॉक्रोच जनता पक्षावर निशाणा साधला. त्यांनी सीजेपी नेत्यांनी बाँडवर केलेल्या स्वाक्षरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी बाँडवर सही केली असेल, तर त्यांनी पुढे आंदोलन करणार नसल्याचे वचन दिले. त्यांना आता आंदोलन केलं, तर पोलीस त्यांना शांतता भंग केल्याचा आरोपाअंतर्गत ताब्यात घेतील. बाँडचं उल्लंघन केल्याप्रकरणी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना तुरुंगात डांबले जाईल. आता ते काही दिवसांसाठी तुरुंगात होते. पुढे त्यांना काही महिन्यांसाठी तुरुगांत डांबले जाईल. ते तुरुंगात जायला घाबरतात. त्यामुले सीजेपी संपली आहे, असा दावा माजी न्यायाधीशांनी केला.

Follow Us
ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज....
Shivsena : ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी...
Shivsena : महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी; योगेश कदमांनी दिले संकेत
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार