AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारताच्या हाती मोठा खजिना, देशाला येणार सोन्याचे दिवस, चीनला धक्का

भारत आणि अमेरिकेत संबंध ताणले गेलेले असताना भारतीयांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. भारताच्या हाती मोठा खजिना लागला आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अजूनही चांगले दिवस येण्याची दाट शक्यता आहे.

मोठी बातमी! भारताच्या हाती मोठा खजिना, देशाला येणार सोन्याचे दिवस, चीनला धक्का
Papum and Pare River
| Updated on: Aug 17, 2025 | 4:17 PM
Share

भारत आणि अमेरिकेमधील अनेक वर्षांचे चांगले संबंध खराब होण्याच्या मार्गावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे, ज्यानंतर खळबळ उडाली. आता भारताकडून थेट मोठा संदेश देण्यात आलाय. भारतावर जरी इतक्या मोठ्या प्रमाणात अमेरिकेकडून टॅरिफ लावला असला तरीही भारताचा शेजारी चीनला टॅरिफ लावला नाहीये. चीनबद्दल एक पाऊल मागेची भूमिका घेताना डोनाल्ड ट्रम्प दिसत आहेत. हेच नाही तर त्यांनी चीनवर काैतुकांचा वर्षाव केला. भारत आणि चीनमधील यादरम्यान संबंध चांगले झाल्याचे सांगितले जातंय. मात्र, चीन कधीही आपली रंग बदलू शकतो.

मागील काही वर्षांपासून भारतापेक्षा चीन काही गोष्टींमध्ये पुढे गेलाय. भारताला काही गोष्टींसाठी चीनकडे बघावे लागते. पण चीनकडून कधी कधी भारताला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. रेअर अर्थ मेटल्ससाठी भारताला चीनवरच अवलंबून राहवे लागते. यापुढे भारताला चीनकडे बघण्याची अजिबातच गरज नाहीये. भारताला रेअर अर्थ मेटल्सचा मोठा खजिना मिळाला आहे. यामुळे आता चीनवर अवलंबून राहण्याची अजिबातच गरज नाहीये.

अरूणाचल प्रदेशामधील डोंगरांमधून दोन नद्या वाहतात. यापैकी एका नदीचे नाव पापुम आणि दुसऱ्या नदीचे नाव पारे आहे. आता या नद्या संपूर्ण देशात चर्चेत आल्या आहेत. मुळात म्हणजे पापुम आणि पारे नद्यांमध्ये रेअर अर्थ मेटल्सचा मोठा खजिना सापडला आहे. रिपोर्टनुसार खनिज मंत्रालयाने एक पुस्तक प्रकाशित केले असून यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की, या भागात मोठ्या प्रमाणात नियोडिमियम सापडले आहे. नियोडिमियम हे महत्वाचा घटक असून इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करते.

रेअर अर्थ मेटल्सचा उपयोग मॅग्रेट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो आणि इलेक्ट्रिक वाहनांना मदत होते. या दोन्ही नद्यांमधून जर रेअर अर्थ मेटल्सचा खजिना काढण्यात आला तर पुणे, चेन्नई आणि दिल्ली गुडगाव शहरातील इलेक्ट्रिक व्हिकल आणि ऑटोमोबाईल उद्योगाला एक मोठा आधार मिळेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारताला चीनवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. याचा फायदा थेट भारताला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.