भारत रशिया संबंध तणावात, दोन मोठ्या या कंपन्यांनी थांबली तेल खरेदी, 280 दशलक्ष डॉलर तब्बल..

भारत आणि रशियातील संबंध अनेक वर्षांपासूनचे चांगले आहेत. मात्र, अमेरिकेला भारत आणि रशियातील मैत्री बघवत नाहीये. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता भारतावर मोठा दबाव आहे. त्यामध्येच भारताच्या दोन कंपन्यांनी मोठा निर्णय घेतलाय.

भारत रशिया संबंध तणावात, दोन मोठ्या या कंपन्यांनी थांबली तेल खरेदी, 280 दशलक्ष डॉलर तब्बल..
Russia oil
| Updated on: Oct 31, 2025 | 11:01 AM

भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी याकरिता अमेरिका आग्रही आहे. भारतावर विविध प्रकारे दबाव टाकण्याचे काम अमेरिका करत आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतरही अमेरिका टॅरिफ अजून वाढवण्याच्या धमक्या देत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले की, भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार अंतिम टप्प्यात आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमध्ये व्यापार चर्चा जवळपास बंद होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला वचन दिले असून भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार आहे. मात्र, भारताने स्पष्ट केले की, आम्ही आमच्या नागरिकांसाठी जे योग्य निर्णय आहेत, ते घेऊ. अमेरिकेचा दबाव भारतावर चांगलाच वाढल्याचे दिसतंय.

अमेरिकेच्या दबावानंतर आता भारताच्या दोन मोठ्या तेल कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी न करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आग्रहानंतर भारताने पाऊस मागे घेतल्याचे यावरून दिसतंय. एचपीसीएल मित्तल एनर्जी लिमिटेड (एचएमईएल) या कंपनीने रशियाकडून तेलाची खरेदी थांबवली आहे. याबाबतची त्यांनी अधिकृत घोषणाही केली. अमेरिकेच्या टॅरिफनंतरही पहिली भारतीय कंपनी आहे, जिने तेलाची आयात थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे अमेरिकेचा दबाव अधिक वाढल्याच दिसतंय.

एचएमईएल आतापर्यंत रशियाकडून 280 दशलक्ष डॉलर मूल्याची तेल खरेदी केली. भटिंडा येथे दर वर्षी नऊ दशलक्ष टन क्षमतेचा त्यांचा तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे. मात्र, कंपनीने अचानक रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याचे सतत सांगितले जातंय. आता खरोखरच त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजने अगोदरच रशियाकडून तेल खरेदी थांबली आहे. फक्त त्यांनी याबाबतची घोषणा केली नाही. एचएमईएलने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याची थेट घोषणा केली. रशिया आणि भारताचे अनेक वर्षांचे चांगले संबंध आहेत. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो. मात्र, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशिया युक्रेन युद्ध अधिक काळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला.