
मोदी सरकारने अमेरिकेने जोरदार टॅरिफ लावूनही भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबूती देण्यासाठी जीएसटी दरात कपात केली, त्यामुळे सणासुदीच्या दिवसात ग्राहकांनी बाजारपेठेत मोठी खरेदी केल्याने घरगुती बाजारपेठेत चैतन्य परतले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम जाणवला नाही. सणासुदीत भारतीय बाजारात सहा लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
रिटेल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म बिजोमच्या आकडेवारीनुसार २२ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सणासुदीच्या खर्चात सुमारे ८.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने सांगितले की या दरम्यान विक्री सुमारे ६ लाख कोटी रुपयांपर्यंत ( ७६.६ अब्ज डॉलर ) पर्यंत पोहचली आहे. ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, फर्निशिंग आणि मिठाई सारख्या वस्तूंची मागणी सर्वाधिक राहिली आहे.
मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि महिंद्रा सारख्या कंपन्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत वाढ झाली आहे. टाटा मोटर्सने नवरात्र आणि धनतेरसच्या दरम्याने १ लाखाहून अधिक कारची डीलिव्हरी केली, तर महिंद्रने ट्रॅक्टरची विक्रीत २७ टक्के वृद्धी झाली आहे. हुंडई मोटरच्या विक्रीत धनतेरसला गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के वाढ झाली आहे. मारुती डिलरशिप्सवर ग्राहक इतके खूश झाले की रविवारीही उत्पादन जारी ठेवावे लागले.
कोटक महिंद्र बँक आणि एसबीआय कार्ड्स एण्ड पेमेंट्स सारख्या फायनान्शियल फर्मच्या आकड्यानुसार किचन कॅटेगरीत देखील खरेदीसाठी झुंबड उडाली. प्रेशर कुकर आणि अन्य घरगुती उत्पादनांवर टॅक्स कपातीचा थेट फायदा ग्राहकांना मिळाला.
एप्रिलमध्ये अमेरिकेच्या टॅरिफच्या कारणांनी सुरुवाती रिकव्हरी थांबली होती. परंतू २२ सप्टेंबर २०२५ पासून जीएसटी दरातील कपातीनंतर बाजारातून रिकव्हरी केली. यावरुन हे सिद्ध होते की घरगुती उपायांनी आर्थिक उलाढालीला मजबूती दिली जाऊ शकते. तरीही आर्थिक आव्हाने अजूनही आहेत. मंद उत्पन्न वाढ आणि कमकुवत श्रम बाजार यांचा दीर्घकालीन ट्रेंडवर अजूनही परिणाम होऊ शकतो.