कोण आहेत अणूबॉम्ब असलेले 9 सर्वात ताकदवान देश? भारताचे स्थान काय ?
जगात रशिया - युक्रेन युद्ध आणि इस्राईल आणि हमास संघर्ष सुरु असताना आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान अण्वस्र चाचण्या करत असल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे.

जगात सध्या अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. इराण अण्वस्र विकसित करत असल्याच्या वृत्तानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तान अण्वस्र चाचणी करत असल्याचे म्हटले आहे. इस्रायल आणि हमास त्यानंतर रशिया-युक्रेन संघर्ष सुरुच असताना जगात अण्वस्र तयार करण्याची अहमिका लागली आहे. अमेरिकेने देखील आता रशिया, उत्तर कोरियामुळे अण्वस्रांविषयी जगाला धोका असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेने इराणच्या तेहराणवरील आण्विक ठिकाणांवर मोठा हल्ला केला होता. त्यानंतर इराण आपली अण्वस्रं ठिकाणे सुरक्षित असल्याचा दावा केला होता. परंतू आता पाकिस्तानच्या अण्वस्रांबाबत अमेरिकेच्या अध्यक्षांनी केलेल्या दाव्यामुळे जगात कोणाकडे किती अण्वस्रे आहेत याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीट्यूट(SIPRI) च्या इयरबुक 2025 नुसार जानेवारी 2025 पर्यंत जगातील 9 देशांकडे मिळून 12,241 अण्वस्रे आहेत. यात भारताचाही समावेश आहे. जागतिक तणाव असतानाही काही देश आपली अण्वस्र कार्यक्रम अपग्रेड करत आहेत. एकीकडे रशिया युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेत संघर्ष सुरु असताना अण्वस्र मुक्त करण्याची मागणी होत असताना दुसरीकडे यांची संख्या मात्र वेगाने वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढत आहे.
SIPRI च्या अहवालात म्हटले आहे की सुमारे 3,912 आण्विक अस्रे जगभरात क्षेपणास्र आणि एअरक्राफ्टवर तैनात आहेत. यातील 2,100 अस्रांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, म्हणजे यांना मिनिटांत वापरता येऊ शकते.
जगातील अण्वस्रांची स्थिती दाखवणारा तक्ता –
| क्रमांक | देशाचे नाव | अण्वस्रांची संख्या | स्थिती |
|---|---|---|---|
| 1 | अमेरिका (USA) | 5,177 | सर्वाधिक अण्वस्रे बाळगणारा देश,सातत्याने आधुनिकीकरण जारी |
| 2 | रशिया (Russia) | 5,459 | जगातील सर्वात मोठा न्युक्लिअर आर्सेनल,अनेक अण्वस्रे हाय अलर्टवर |
| 3 | चीन (China) | 600 | वेगाने वाढणारा अण्वस्र कार्यक्रम, नवीन क्षेपणास्रे सिस्टम विकसित करत आहे |
| 4 | फ्रान्स (France) | 290 | यूरोपचा प्रमुख आण्विक देश, NATO चा सदस्य |
| 5 | ब्रिटन (UK) | 225 | ट्रायडेंट मिसाईल सिस्टमवर अवलंबून, मर्यादित परंतू अत्याधुनिक स्टॉक |
| 6 | भारत (India) | 180 | 'नो फर्स्ट यूज' चे धोरण , मिसाईल रेंज वाढवण्यावर फोकस |
| 7 | पाकिस्तान (Pakistan) | 170 | भारताविरोधा न्यूक्लिअर बॅलन्स राखण्याचे धोरण |
| 8 | इस्राईल (Israel) | 90 | औपचारिक रूपाने अण्वस्रधारी नाही, परंतू एटॉमिक क्षमता राखून |
| 9 | उत्तर कोरिया (North Korea) | 50 | लागोपाठ क्षेपणास्र चाचण्यांमुळे जागतिक चिंतेचे केंद्र |
न्यूक्लिअर मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम्सवर काम करत आहेत 9 आण्विक देश –
याशिवाय सर्व 9 अण्वस्रधारी देश आता आपल्या न्युक्लिअर मॉर्डनायझेशन प्रोग्रॅम्सवर काम करत आहेत. ज्या अंतर्गत जुन्या अण्वस्रांना नव्या टेक्नॉलॉजीने अपग्रेड केले जात आहे.
काही देशांनी निवृत्त झालेल्या जुन्या अण्वस्रांना केले नष्ट
काही वर्षापूर्वी काही देशांनी निवृत्त झालेल्या अण्वस्रांना नष्ट केले आहे. परंतू जितकी अण्वस्रं नष्ट केली जात आहेत तेवढ्याच संख्येने नवीन तयार केली जात आहेत. याचा अर्थ जग अजूनही अणूयुद्धाच्या धोक्यातून बाहेर आलेले नाही.
