AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय वंशाच्या वकिलानेच डोनाल्ड ट्रम्प यांना फोडला घाम, थेट अमेरिकेच्या कोर्टातच…

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेच्या कोर्टाने अत्यंत मोठा दणका दिला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टॅरिफची डोकेदुखी काही कमी होण्याचे नाव घेत नाही. कोर्टाच्या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या शक्तीचा फायदा घेत नवीन अध्यादेशच काढून टाकला.

भारतीय वंशाच्या वकिलानेच डोनाल्ड ट्रम्प यांना फोडला घाम, थेट अमेरिकेच्या कोर्टातच...
Neal Katyal Us
| Updated on: Feb 21, 2026 | 1:08 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने मोठा दणका टॅरिफच्या मुद्द्यात दिला. डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बेकायदेशीर असून अशाप्रकारे टॅरिफ लावला जाऊ शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट शब्दात म्हटले. मात्र, कोर्टाच्या निर्णयाला चुकीचा म्हणत यावर नाराजी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. कोर्टाचा निर्णय येताच त्यांनी थेट लगेचच एक आदेश काढत जगातील सर्व देशांवर 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला. थोडक्यात काय तर अमेरिकेत आयात होणाऱ्या प्रत्येक मालावर 10 टक्के टॅरिफ असणार आहे. अमेरिकेच्या कोर्टाने कायद्यावर बोट ठेवत हे चुकीचे असल्याचे म्हटले. कोर्टाचा निर्णय येताच प्लॅन बी डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केला. 10 टक्के टॅरिफ लगेचच लागू केला जाईल, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या माध्यमातून अनेक देशांना धमकावताना दिसत आहेत. कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने दणका दिला. या ऐतिहासिक न्यायालयीन लढाईमध्ये भारतीय वंशाचे वकील नील कत्याल यांनी महत्वाची भूमिका बजावली. थेट एका भारतीय वंशाच्या वकिलांनीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफची हवा काढली. डोनाल्ड ट्रम्प इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स अॅक्टचा वापर करून जगातील देशांच्या मालावर वाटेल तेवढा टॅरिफ लावत होते.

नील कत्याल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. यामधील खास बाब म्हणजे कोर्टात या महत्वाच्या विषयावर युक्तिवाद करण्यासाठी वकिलांमध्ये कॉईन उडवण्यात आला आणि त्यावरून ठरले की, हा जागतिक विषय अमेरिकेच्या कोर्टात नील कत्याल मांडणार. नील यांनी कोर्टाच म्हटले की, अध्यक्षांना नक्की शक्तीशाली अधिकार आहेत.

पण त्यापेक्षा संविधान जास्त शक्तीशाली आहे. कोर्टात बाजू मांडताना नील कत्याल यांनी सळो की पळो करून सोडले. नील कत्याल याचे आई वडील भारतातून अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले. नील यांचे वडील इंजिनिअर तर आई पेशाने डॉक्टर आहे. येल लॉ स्कूलमधून पदवी मिळून अनेक वर्ष त्यांनी कोर्टात नोकरी केली. डोनाल्ड ट्रम्प  यांच्या टॅरिफला कोर्टात नडणारी व्यक्त दुसरी तिसरी कोणीही नसून भारतीय वंशाची आहे.

Follow Us
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा