AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Gen Z Protest: नेपाळमध्ये भारतीय महिला पर्यटकाचा धक्कादायक अनुभव, हॉटेलमध्ये जमाव शिरला अन्..

Nepal Gen Z Protest: सोशल मीडियावरील बंदी हे नेपाळमधील तरुणांच्या संतापाचं कारण ठरलं असलं तरी त्याच्या जोडीला मोठ्या प्रमाणात पसरलेला भ्रष्टाचार, सरकारची निष्क्रियता आणि घराणेशाही यामुळे तरुणांमध्ये प्रचंड रोष असल्याचं समोर येत आहे.

Nepal Gen Z Protest: नेपाळमध्ये भारतीय महिला पर्यटकाचा धक्कादायक अनुभव, हॉटेलमध्ये जमाव शिरला अन्..
Nepal Gen Z Protest: Indian tourist Upasita Kale Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 10, 2025 | 11:01 AM
Share

Nepal Gen Z Protest: नेपाळमध्ये ‘जेन- झी’ने सरकारविरोधात सुरू केलेल्या निदर्शनांनी अधिकच उग्र स्वरुप धारण केलंय. पोखरा इथला एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून त्यामध्ये एक भारतीय महिला भारत सरकारकडे मदतीचं आवाहन करताना दिसतेय. उपासिता काळे असं त्या महिलेचं नाव आहे. ज्या हॉटेलमध्ये ती राहत होती, त्याला निदर्शकांनी आग लावल्याचं तिने सांगितलंय. त्यावेळी उपासिता स्पा मध्ये होती आणि नंतर काठ्या घेऊन एक जमाव तिच्या मागे धावू लागला. अखेर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी ती तिथून पळाली. व्हॉलीबॉल लीग आयोजित करण्यासाठी उपासिता नेपाळमध्ये गेली होती.

या व्हिडीओमध्ये ती सांगते, “माझं नाव उपासिता काळे आहे आणि मी हा व्हिडीओ प्रफुल्ल गर्ग यांना पाठवतेय. मी भारतीय दूतावासालाही विनंती करते की कृपया आमची मदत करा. ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी कृपया मदत करा. मी नेपाळमधील पोखरा इथं अडकले आहे. इथं मी व्हॉलीबॉल लीग आयोजित करण्यासाठी आली होती. सध्या मी ज्या हॉटेलमध्ये राहत होते, ते जळून खाक झालं आहे. माझं सर्व सामान माझ्या हॉटेल रुममध्ये होतं. मी स्पा मध्ये होते आणि लोक अचानक माझ्या मागे काठ्या घेऊन धावत होते. कसंबसं मी माझा जीव वाचवून पळाले.”

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला. निदर्शकांचा संताप इतका अधिक होता की, त्यांनी पार्लमेंटसह अनेक महत्त्वाच्या इमारतींची जाळपोळ केली. दरम्यान, भारताने नेपाळमधील आपल्या नागरिकांना खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 19 जणांचा मृत्यू झाला आणि किमान 300 जण जखमी झाले. निदर्शकांनी पर्यटकांनाही सोडलं नाही, असं उपासिताने म्हटलंय.

View this post on Instagram

A post shared by Prafful Garg (@praffulgarg)

“इथली परिस्थिती खूप वाईट आहे. रस्त्यावर जागोजागी आगी लावल्या जात आहेत. ते पर्यटकांनाही सोडत नाहीयेत. त्यांना कोणाचीच पर्वा नाही. ते कसलाच विचार न करता सर्वत्र आग लावत आहेत. मी भारतीय दूतावासांना विनंती करते की कृपया हा व्हिडीओ भारत सरकारपर्यंत पोहोचवावा. मी हात जोडून विनंती करते की कृपया आमची मदत करा. माझ्यासोबत इथं बरेच लोक आहेत आणि आम्ही सर्वजण इथे अडकलो आहोत”, अशी विनंती तिने केली आहे.

दरम्यान, काठमांडूमधील भारतीय दूतावासाने नेपाळमधील सर्व नागरिकांना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तिथं प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत मदतीची आवश्यकता असलेल्यांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकसुद्धा जारी केला आहे.

काठमांडू इथला भारतीय दूतावासातील दूरध्वनी क्रमांक: 977 – 980 860 2881, 977 – 981 032 6134 (व्हॉट्सॲप कॉलही करू शकता.)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...