Flydubai हल्ल्या प्रकरणी ईराणचा खळबळजनक दावा, थेट ट्रम्प, नेतान्याहू यांचे नाव घेतले अन्….

Flydubai Flight: फ्लायदुबई विमानावरील हल्ल्यासंदर्भात आता नवनवीन ट्विस्ट समोर येत आहे, आता इराणने आता एक गंभीर आरोप केला आहे ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

Flydubai हल्ल्या प्रकरणी ईराणचा खळबळजनक दावा, थेट ट्रम्प, नेतान्याहू यांचे नाव घेतले अन्....
| Updated on: Oct 02, 2026 | 11:10 AM

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमानावरील हल्ल्यासंदर्भात इराणने आता एक गंभीर आरोप केला आहे. इराणी माध्यम ‘प्रेस टीव्ही’ने दावा केला आहे की, ही संपूर्ण घटना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचा एक कट असू शकतो. या वृत्तानुसार, ७ ऑक्टोबरच्या हमास हल्ल्यासंदर्भात नेतान्याहू यांच्यावरील प्रश्नांना बगल देणे, २७ ऑक्टोबरच्या इस्रायली निवडणुकांपूर्वी आपली स्थिती मजबूत करणे आणि इराणविरुद्ध नवीन कारवाईसाठी निमित्त तयार करणे, या उद्देशाने हा कथित कट रचला गेला असावा.

हा आरोप अशा वेळी करण्यान आला जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यामागे इराणचा हात आहे असं म्हटल्यानंतर आला आहे. ट्रम्प म्हणाले की, जर फ्लायदुबई विमानाच्या सह-वैमानिकाचा इराणशी कोणताही संबंध उघड झाला, तर इराणवर कठोर कारवाई केली जाईल. अमेरिका या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, यात इराणचा सहभाग असू शकतो.” पण त्यांनी या संदर्भात कोणताही तपशील दिला नाही.

Loading...

संयुक्त अरब अमिरातीहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात, एका ओमानच्या सह-वैमानिकाने कॅप्टनवर हल्ला केला. भारतीय वैमानिक स्मिथ मछारवर हल्ला होत असनाताही त्याने विमानावरील कंट्रोल काही सोडला नाही.  प्रवासी आणि इतर क्रू सदस्यांनी कॉकपिटमध्ये प्रवेश करून विमान स्थिर करण्यास मदत केली. त्यानंतर विमानाने सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग केले.

विमानात १८२ लोक होते, त्यापैकी बहुतेक इस्रायली नागरिक होते. भारतीय कॅप्टन स्मित मछारवर इतके वार करण्यात आले की रक्तस्त्राव थांबतच नव्हते. नंतर अबू धाबीमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सध्याची त्यांची प्रकृतीत सुधारणा दिसून आली आहे,

इस्रायली गुप्तचर आणि सुरक्षा अधिकारी सौदी अरेबियातील तपासात सहकार्य करत आहेत. इस्रायलने सह-वैमानिकाला चौकशीसाठी आपल्या देशात प्रत्यार्पित करण्याची विनंतीही केली आहे. संयुक्त अरब अमिरातीने (UAE) देखील आपला स्वतःचा तपास सुरू केला असून, या हल्ल्यामागे कोणताही दहशतवादी हेतू होता का, हे निश्चित केले जाईल असे म्हटले आहे.

पंतप्रधान नेतान्याहू यांनी दावा केला आहे की, ओमानचा सह-वैमानिक इस्लामी कट्टरपंथी विचारसरणीने प्रभावित होता. ही माहिती त्यांना कशी मिळाली, असे विचारले असता त्यांच्या कार्यालयाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us