Smit Machchhar: सहवैमानिकाने कॅप्टन स्मित मछारवर हल्ला का केला? डोकं चक्रवणारी माहिती समोर
PM Netyanahun On Smit Machchhar: भारतीय वैमानिक स्मित माछर यांच्यावर सहवैमानिकाने का हल्ला केला याबद्दल इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहूनने एक विधान केले आहे.

Smit Machchhar FLY Dubai: बुधवारी, दुबईहून तेल अवीवला जाणारे फ्लायदुबईचे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच त्या विमानात असं काही घडलं ज्यामुळे सर्वांनाच ऐकून धक्का बसला. विमानाच्या केबिनमध्ये, सह-वैमानिकाने कॅप्टन स्मित मछार यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. इतकं असूनही भारतीय वैमानिकांने आपले कर्तव्य बजावले. त्याने विमानावरील कंट्रोल अजिबात सोडला नाही आणि शेकडो लोकांचे प्राण वाचवले. यानंतर फक्त भारतातचत नाही तर संपूर्ण जगात त्याचे कौतुक होत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या भारतीय वैमानिकाचे कौतुक केले. पण आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे.
पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले…
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, तो सह-वैमानिक इस्लामी कट्टरतावादाने प्रभावित झाला होता. आम्हाला माहित आहे की त्याच्यावर इस्लामी कट्टरतावादी विचारसरणीचे संस्कार झाले होते. ही माहिती त्या व्यक्तीच्या पर्सनल गोष्टींमधून समजत आहे.ताब्यात घेतल्यानंतर सह-वैमानिकाने विमान कर्मचाऱ्यांना हाक मारली. “मला मारा, मला मारा” असे ओरडत होता, हे स्पष्ट आहे की त्याला आत्महत्या करायची होती, यात काही शंका नाही. त्या माणसाला विमान पाडायचे होते, याची दाट शक्यता आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी तुम्हाला त्याच्या इस्लामी विचारांबद्दल आणि त्याच्या पार्श्वभूमीतील कट्टरतेबद्दल जे सांगितले, त्याच्याशी याची सांगड घातल्यास, मला वाटते की आपल्याला एक चांगला सुगावा लागेल. पण तरीही, मी कोणताही निष्कर्ष काढत नाहीये. सध्या आमच्याकडे फक्त हेच संकेत आहेत.”
प्रत्यक्षदर्शी आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सह-वैमानिकाने कॅप्टन स्मित मछार यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर विमान हजारो फूट खाली कोसळत असताना, ते पुन्हा नियंत्रणात आणण्यात आले. हा हल्ला थांबवण्यासाठी प्रवासी आणि कर्मचारी कॉकपिटमध्ये धावून गेले.”
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, इस्रायली प्रवाशांनी हल्लेखोराला ताब्यात घेण्यास मदत केली, तर विमानातील एका दंतवैद्याने कॅप्टनला प्रथमोपचार दिले. कॅप्टन मच्छर यांना गंभीर दुखापत झाली होती आणि त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. विमानातील दोन राखीव वैमानिकांनी विमानाचा ताबा घेतला आणि सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर ते सुरक्षितपणे उतरवले.”
