युद्ध थांबलं पण अमेरिकेला फुटला घाम, होर्मुझच्या पाण्यात…इराणच्या एका चुकीने जगात खळबळ!

अमेरिका आणि इराण याच्यातील शस्त्रसंधीनंतर आता पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होत आहे. असे असतानाच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मोठी आणि धक्कादायक अशी माहितीस समोर येत आहे.

युद्ध थांबलं पण अमेरिकेला फुटला घाम, होर्मुझच्या पाण्यात...इराणच्या एका चुकीने जगात खळबळ!
donald trump and strait of hormuz
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 11, 2026 | 4:35 PM

Strait Of Hormuz : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात तात्पुरती शस्त्रसंधी झालेली आहे. दोन आठवड्यापर्यंत कोणीही एकमेकांवर हल्ला करणार नाही. ही शस्त्रसंधी झाल्यानंतर दुसरीकडे पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळात चर्चा होत आहे. युद्ध कायमचे संपवण्यासाठी दोन्ही शिष्टमंडळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, एकीकडे युद्ध संपवण्यासाटी चर्चा सुरू असताना दुसरीकडे संपूर्ण जगाला हादरवून टाकणारी माहिती समोर येत आहे. सध्या युद्ध थांबलेले असले तरीही होर्मुझच्या सामुद्रधुनीत मात्र मोठा विध्वंस घडण्याची दाट शक्यता आहे. इराणने युद्धात गुपचूप केलेलं एक काम आता सर्वांची डोकेदुखी ठरत आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

न्यूयॉर्क टाईम्सने एक वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने होर्मुझच्या समुद्रधुती काही भूसूरंग पेरले होते. या सामुद्रधुनीवर आपलेच नियंत्रण राहावे आणि आपल्या इशाऱ्यानुसारच या सामुद्रधुनीतील जलवाहतूक चालू आणि बंद व्हावी यासाठी इराणने हे पाऊल उचलले आहे. आता मात्र शस्त्रसंधी झाली आहे. त्यामुळे या भूसुरुंगांची गरज उरलेली नाही. परंतु हे भूसुरुंग नेमके कुठे-कुठे पेरलेले आहेत, हेच इराणला समजत नाहीये. भूसुरुंगांची जागाच इराणला शोधता येत नाहीये. त्यामुळे आता इराणसह अमेरिकेचीही चिंता वाढली आहे.

अमेरिकेलेही शोधता येत नाहीयेत भूसुरुंग

या भूसुरुंगांची जागाच इराण विसरून गेल्याने संपूर्ण जगाची भीती वाढली आहे. कारण जगाच्या एकूण गरजेपैकी साधारण 20 टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा याच सामुद्रधुनीतून होतो. लाखो टन कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू घेऊन जाणारी जहाजं या मार्गातून जातात. परंतु इराणने यात भूसुरुंग पेरल्याने काय या जहाजांना धोका निर्माण झाला आहे. भूसुरुंगांचा कधीही स्फोट होण्याची शक्यता आहे. पाण्यात पेरलेले भूसुरुंग निकामी करण्याचे तंत्र इराणकडे नाही. तसेच अमेरिकेलाही हे भूसुरुंग शोधणे आव्हानात्मक झाले आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us