AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EXPLAINER : इराणकडे अशी कोणती आहेत शस्रे ?, बलाढ्य अमेरिका आणि इस्राईलला कुठपर्यंत देईल टक्कर ?

इराण आणि अमेरिका- इस्राईलचे युद्ध पेटले आहे. या युद्धात इराणच्या नेतृत्वाची पहिली फळीच कापून टाकण्यात आली आहे. त्यामुळे हे युद्ध लवकर संपेल असे म्हटले जात आहे. इराण अचानक ड्रोन हल्ले करुन निकराची लढाई सुरु केली आहे. त्यामुळे हे युद्ध लांबणार की लवकर संपणार याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.

EXPLAINER : इराणकडे अशी कोणती आहेत शस्रे ?, बलाढ्य अमेरिका आणि इस्राईलला कुठपर्यंत देईल टक्कर ?
IRAN Underground ‘missile cities’
| Updated on: Mar 02, 2026 | 5:35 PM
Share

अमेरिकेच्या पाठींब्यावर इस्राईलने अखेर इराणवर युद्ध थोपवले आहे. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी यांच्या खात्मा करण्यात आला आहे. मध्य पूर्वेत आता तणावपूर्ण स्थिती बनली आहे. यानंतर इराणने बदला घेत इस्राईलसह अनेक देशांवर हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेची लष्करी तळ असणाऱ्या देशांनाच इराणने टार्गेट केले आहे. यात कतार, दुबई, युएई आणि बहारीनचा समावेश आहे. इराणने या हल्ल्यात अशा अनेक शस्रास्रांचा वापर केला आहे, त्यामुळे जग चकीत झाले आहे. इराणने बॅलेस्टीक आणि क्रुझ मिसाईल आणि ड्रोनचा प्रचंड वापर केला आहे. गेल्यावर्षी जून २०२५ मध्ये इराण आणि इस्राईलचे युद्ध १२ दिवस चालले होते.  हे युद्ध खामेनी यांच्या मृत्यूमुळे किती दिवस चालले याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

अलजझीराच्या बातमीनुसार इराणने गेल्या तीस वर्षात अनेक प्रकारच्या बॅलेस्टीक आणि क्रुझ मिसाईल विकास केला आहे. या मिसाईलची लांबी वेगवेगळी आहे.  काही क्षेपणास्रे १०-२० मीटर लांब आहेत. यांच्या माऱ्याचा पल्ला मोठा असून पश्चिम आशिया आणि आसपासच्या अनेक देशांपर्यंत त्यांची विध्वंस क्षमता आहे.

इराणकडे कोणती क्षेपणास्रे आहेत ?

इराणकडे अनेक प्रकारची क्षेपणास्रे आहेत. त्यांच्याकडे विविध अंतरापर्यंतचे टार्गेट उडवणारी छोटी, मध्यम आणि लांबपल्ल्याची क्षेपणास्रे आहेत. यांची रेंज ३०० किमी ते २,५०० किमीपर्यंत असल्याचे म्हटले जात आहे. छोट्या क्षेपणास्रात फतेह -११० चा समावेश असून याची मारक क्षमता ३०० किमीपर्यंत आहे. राद – ५०० आणि फतेह – ३१३ या क्षेपणास्रांचा पल्ला हा ५०० किमीपर्यंतचा आहे.झुल्फिकार क्षेपणास्राचा पल्ला सुमारे ७०० किलोमीटरपर्यंतचा आहे. तसेच कियम – १ चा पल्ला हा ८०० किमीपर्यंतचा आहे. या क्षेपणास्राचा वापर आजूबाजूच्या भागात हल्ला करण्यासाठी करता येत आहे. मध्यम पल्ल्याचा क्षेपणास्रांमध्ये शाहाब – १ आणि शाहाब – २ चा समावेश आहे, यांचा पल्ला ३०० ते ७०० किमीपर्यंतचा आहे.

शाहाब – ३ ही अत्यंत शक्तीशाली मिसाईल मानली जात असून हीचा पल्ला १,३०० ते १,४५० किलोमीटरपर्यंतचा असू शकतो. कद्र आणि गदर मिसाईलचा पल्ला १,६०० ते २,००० किलोमीटरचा सांगितला जात आहे. इमाद मिसाईल सुमारे १,७०० किलोमीटरपर्यंत टार्गेट नष्ट करु शकते. त्यामुळे हे क्षेपणास्र दुरच्या देशांपर्यंत पोहचण्याची क्षमता त्याच्यात आहे. लांबपल्ल्याच्या क्षेपणास्रात खोर्रमशहर आणि सज्जील असा क्षेपणास्रांचा समावेश आहे. यांचा पल्ला तर २,००० ते २,५०० किलोमीटरचा असल्याचे म्हटले जात आहे.

सौमार एक क्रुझ मिसाईल असून त्याची लांबी सुमारे २,५०० किलोमीटरपर्यंत आहे.खैबरशेकरचा पल्ला १,४५० किमी इतका आहे. इराण त्याच्या क्षेपणास्रांच्या ताकदीला त्यांच्या सुरक्षेचा महत्वाचा हिस्सा मानत आहे. वेगवेगळ्या बातम्यांनुसार या मिसाईलच्या नेमक्या क्षमतेच्या संदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. येथे दिलेली आकडेवारी देखील अंदाजित आहे.

अंडरग्राऊंड ड्रोनचे भंडार

इराणचे अंडरग्राऊंड ड्रोनचे बेस पर्वतमय भागात ( ५०० मीटर खोल ) भूमिगत वसवलेले आहेत. शिराज,खोर्रमाबाद, केरमानशाह, कोहजीर, परचिन आणि पर्सियन गल्फ किनारपट्टी असे एकूण २० ते ३० बेस वसवलेले आहेत. अनेक त्यातील गुप्त ठिकाणी आहेत. अमेरिका त्यांना संपूर्णपणे नष्ट करु शकलेले नाही. कारण इराण हा डोंगराळ भागात वसलेला देश असून त्यांच्या भूमिगत भागात ही शस्रे लपवलेली आहेत आणि ती खोलवर गुप्त ठिकाणी आहेत.

इराणी सैन्याने खासकरुन इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोअरने गेल्या अनेक वर्षात भूमिगत छूपे बेस बनवलेले आहेत. यांना मिसाईल सिटीज वा शहरांची मोशकी म्हटले जाते. हे सर्व अंडरग्राऊंड अड्डे डोंगरात जमीनीच्या खाली आहेत. येथे ड्रोन (शाहेद – १३६ ), बॅलेस्टिक मिसाईल, क्रुझ मिसाईल आणि अन्य हत्यारे लपवलेली आहेत. इराणने हे तळ शत्रूंच्या हल्ल्यापासून सुरक्षित रहाण्यासाठी बनवलेले आहेत. अमेरिकेने राबवलेल्या एपिक फ्युरी मोहिमेत अनेक बेसवर हल्ला झाला परंतू ते पूर्णपणे नष्ट झालेले नाहीत. इराणचा दावा आहे की हे सर्व बेस संपूर्ण देशात पसरलेले आहेत आणि ५०० मीटर आत खोलवर आहेत. मात्र त्यांची नेमकी संख्या आणि लोकेशन जगापासून गुप्त ठेवलेले आहे.

काही बेसबद्दल माहिती उघड झाली आहे –

शिराज ( फार्स प्रांत ) – जाग्रोस पर्वतात एक मोठा अंडरग्राऊंड युएव्ही ( ड्रोन ) बेस आहे. येथे शाहेद सारखे ड्रोन लपवलेले आहेत इस्राईलने साल २०२३ मध्ये याचा व्हिडीओ जारी केला होता.

खोर्रमाबाद ( लोरिस्तान प्रांत ) – येथे सर्वात जास्त क्षेपणास्रे सायलो आहेत. ड्रोन आणि मिसाईल दोन्ही येथे स्टोअर केले आहेत. केनेश्ट कॅन्यन ( केरमानशाह प्रांत ) – IRGC चा हा मोठा अंडरग्राऊंड बेस इराणच्या उत्तरेला असून येथे ड्रोन आणि मिसाईल लाँच सिस्टीम आहे.

कोहजीर आणि परचिन ( तेहरानच्या जवळ )- मिसाईल प्रोडक्शन आणि टेस्टींगसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथे ड्रोन तयार केले जातात. आणि स्टोअर केले जातात. परचिन येथे अलिकडे दुरुस्ती केली होती.

हरमोजगान, सेमनान, केरमानशाह आणि शिराज क्षेत्र – इराणने साल २०२५-२६ मध्ये नवीन मिसाईल सिटीज तयार केल्या आहेत. प्रत्येक अड्डा ५०० ते ७०० मीटर लांबीचा आहे. येथे ड्रोन, फायटर जेट आणि एंटी B-2 सिस्टीम देखील आहे.

दक्षिण किनारपट्टी ( पर्सियन गल्फ ) – IRGC नौदलचा अंडरग्राईंड नेव्हल बेस असून येथे मिसाईलच्या स्पीड बोट आणि ड्रोन आहेत.

हे अंडरग्राऊंड बेस संपूर्ण इराणमध्ये पसरलेले आहेत. – पश्चिम ( केरमानशाह-लोरिस्तान, दक्षिण ( शिराज, हरमोजगान), मध्य ( इस्फहान, कोम) आणि तेहराणच्या आसपास आहेत. इराणच्या मते प्रत्येक प्रांतात हे बेस आहेत.

ड्रोन हल्ला करणारे किती सीक्रेट बेस किती आहेत ?

याची संख्या गुप्त आहे. IRGC चे कमांडर अमीर अली हाजीजादेह यांनी सांगितले की इराणने सर्व प्रांतात आणि शहरात अंडरग्राऊंड बेस तयार केले आहेत.इराणमध्ये अंदाजे २० ते ३० मुख्य मिसाईल सिटीज आहेत. ज्यात अनेक ठिकाणी ड्रोन लपवलेले आहेत. २०२५ मध्ये IRGC ने ती मोठे बेस दाखवलेले.साल २०२६ मध्ये चार नवीन बेस तयार केले होते. एकूण इराणमध्ये डझनावार एअर बेस स्थापन केले होते.

इराणचे ड्रोन हल्ले ( इस्राईल आणि गल्फ देशांवरील ) मोबाईल लाँचर आणि अंडरग्राऊंड बेसमधूनच होत आहेत. शाहेद ड्रोन स्वस्तात तयार केले जाऊ शकतात आणि सहज लाँच केले जाऊ शकतात. अमेरिका-इस्राईलने २०२५-२६ च्या हल्ल्यात अनेक बेसना टार्गेट केले होते. शिराज, केरमानशाह, खार्रमाबाद अशा बेसवर हल्ले झाले होते. मात्र, तरीही अनेक बेस शिल्लक आहेत.

खोलवर आहेत बेस

हे सर्व बेस खोलवर आहेत. त्यांना बेस रॉक आणि काँक्रीट पासून तयार केले असल्याने ते भक्कम आहेत. अमेरिककडे GBU-57 मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर ( बंकर बस्टर ) आहेत. यांना बी-२ बॉम्बरमधून टाकले जाते. मात्र काही बेस इतके खोलवर आहेत की ते संपूर्णपणे नष्ट झालेले नाहीत. साल २०२५ च्या हल्ल्यात फोर्डा, नतांज सारख्या न्युक्लिअर साईट्सवर झालेल्या हल्ल्यात केवळ वरचा भागच क्षतिग्रस्त झाला होता.

नकली आणि धोका – इराणने डेकॉय ( नकली ) बेस देखील तयार केले आहेत. तसेच इराण मोबाईल लाँचरचा वापर करतो.सॅटेलाईट्सने त्यांना शोधणे कठीण असते.

इंटेलिजन्सची कमतरता – अमेरिका-इस्राईलकडे सॅटेलाईट, गुप्तहेर आणि सायबर टुल आहेत. मात्र,तरीही इराणने यांना लपवण्याचे तंत्र शोधले आहे.

सेंकड स्ट्राईकसाठी तयार

ऑपरेशन एपिक फ्युरीत अमेरिकेने बी-२ बॉम्बर, टोमाहॉक मिसाईल आणि LUCAS ड्रोनने देखील हल्ले केले, मात्र, तरीही अंडरग्राऊंड बेस वाचले. इराणने दावा केला आहे की त्यांचे बेस सेंकड स्ट्राईकसाठी तयार केलेले आहे. म्हणजे हल्ल्यानंतरही प्रत्युत्तर देऊ शकतात. ही स्थिती गंभीर आहे. जर युद्ध जारी राहिलेच तर इराण या वाचलेल्या बेसमधून ड्रोन आणि मिसाईल हल्ले करु शकतो. अमेरिका आणि इस्राईलला या इराणच्या या बेसना संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी दीर्घकालीन युद्ध आणि जास्त ताकद लावावी लागणार आहे.

Follow Us
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण.
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान.
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर.
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल.
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं.
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो...
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो....
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?.
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन.
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?.