AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुर्ज खलिफाच्या आत काय ? पर्यटकांद्वारे रोजची कमाई किती होते ? ऐकाल तर चाट पडाल

दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत इराण आणि अमेरिका-इस्राईल युद्धाने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या ८२८ मीटर उंच इमारतीच्या आत नेमके काय आहे ? तिला का बांधण्यात आले होते. सर्व जाणा...

बुर्ज खलिफाच्या आत काय ? पर्यटकांद्वारे रोजची कमाई किती होते ? ऐकाल तर चाट पडाल
Burj Khalifa Dubai
| Updated on: Mar 01, 2026 | 10:52 PM
Share

इराण आणि अमेरिका-इस्राईल युद्धामुळे दुबई देखील चर्चेत आली आहे. दुबई म्हटले की जगातील सर्वात उच्च इमारत ‘बुर्ज खलीफा’ चे नाव येते. ८२८ मीटर उंचीची ही इमारत केवळ एक पर्यटन स्थळी नाही तर दुबईचा अभिमान, वेग आणि यशाची जीवंत प्रतिक आहे. प्रत्येक व्यक्तीला या इमारतीला एकदा तरी पाहावे असे जरूर वाटते. साल २०१० मध्ये या इमारतीला सर्वसामान्यासाठी सुरु करण्यात आले. तेव्हापासून ती जगभरातील पर्यटकांची पहिली पसंत बनली आहे. परंतू या इमारतीला का आणि कसे तयार केले हे फारसे कोणाला माहिती नाही. चला तर वाचूयात या इमारतीच्या निर्मितीची कहाणी आणि तिच्या आत काय आहे नेमके ?

कशी कल्पना सुचली ?

या इमारतीच्या निर्मिती मागे कमाई करणे हा उद्देश्य होता. दुबईचे सरकार केवळ इंधनावर अवलंबून राहू इच्छीत नव्हते त्यांना असे काही बांधायचे होते जे संपूर्ण जगभरातील गुंतवणूकदार आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल.

याच हेतूने व्हर्टिकल सिटी तयार करण्याचे स्वप्न पाहिले गेले. एक व्हर्टीकल म्हणजे उभे शहर बांधायचे. जेथे एकाच छताखाली घर, ऑफीस, आलीशान हॉटेल आणि फिरण्याची जागा असे सर्व काही उपलब्ध असेल.

कसे बांधले हे आश्चर्य ?

बुर्ज खलिफा बांधण्याचे काम साल २००४ साली सुरु झाले आणि इतकी उंच इमारत बांधून पाच वर्षात साल २००९ रोजी तयारही झाली. प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनी ‘SOM’ चे एड्रीयन स्मिथ आणि बिल बेकर यांनी या इमारतीचे डिझाईन केले. या इमारतीला असे बांधले की वेगवान हवा आणि हवामानाचा कोणताही परिणाम हिच्यावर व्हायला नको.

बुर्ज खलिफाची खासियत

या इमारतीला बाहेरुन २६ हजार वजनी काचांचे पॅनल लावण्यात आले आहेत. यास लावण्यासाठी चीनवरुन ३०० हून अधिक खास कारागिर बोलावण्यात आले होते. याचे शिखर ४ हजार टन स्टील पासून बनलेले आहे.विशेष म्हणजे यास बाहेरुन नाही तर इमारतीच्या आतून बनवून फिट केले आहे.

या इमारतील सुविधांचा विचार केला तर रोज येथे सुमारे ९.४ लाख लीटर पाण्याचा पुरवठा होतो. यात ५७ लिफ्ट्स आहेत. ज्यात जगातील सर्वात उंच सर्व्हीस लिफ्ट देखील असून ती ५ हजार किलोपर्यंत वजन उचलू शकते.

किती कमाई करते ?

या इमारतीला बांधण्यासाठी सुमारे १.४ अब्ज डॉलरचा खर्च आला होता. हीचे नाव अबूधाबीचे शासक खलीफा बिन जायद अल नाहयान यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले होते. या प्रकल्पासाठी त्यांनी मोठी आर्थिक मदत केली होती. पर्यटकांच्या तिकीट विक्रीतून या इमारतीला दर वर्षी सुमारे ६२१ दशलक्ष डॉलर ( सुमारे ५,१५४ कोटी रुपये ) कमाई होते. या इमारतीतील अपार्टमेंट्सची किंमती कोट्यवधी रुपये आहे., ज्यामुळे दुबईच्या रिअल इस्टेट बाजाराला अब्जो डॉलरचा फायदा झाला आहे.

बुर्ज खलिफाच्या आत काय ?

या इमारतीच्या सुरुवातीच्या मजल्यावर प्रसिद्ध ब्रँडचे शानदार हॉटेल आहे.याच्या वरच्या मजल्यांवर प्रायव्हेट अपार्टमेंट्स आहेत. त्यांना जिओर्जियो अरमानी यांनी डिझाईन केले आहे. १२२ व्या मजल्यावर पॉश रेस्टोरंट आहे. येथे तुम्ही ढगात बसून जेवणाचा अनोखा आनंद घेता येतो. १२४ व्या, १२५ व्या आणि १४८ व्या मजल्यावर ‘ऑब्जर्वेशन डेक’तयार केलेले आहेत. जेथून दुबईचा ३६० डिग्री नजारा पाहायला मिळतो. याशिवाय यात मोठे कॉर्पोरेट ऑफीस, स्पा, जिम आणि स्विमिंग पुल देखील आहेत. जे पाहून तुम्हाला तुम्ही स्वर्गात आलात असे वाटेल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...